शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रियेदरम्यान गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:43 IST

पहाटेपासून प्रमाणपत्रासाठी रांगा, अधिकच गर्दी झाल्याने बहुतांश जण माघारी

जळगाव : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र वितरीत न होण्यासह संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पुरेसा वेळ दिला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी वाढून बुधवारी दुपारी मोठा गोंधळ झाला. केस पेपरसाठी फिरवाफिरव केली जात असल्याचा आरोप दिव्यांगांकडून केला जात आहे तर रांगेतून एकमेकांच्या पुढे जात असल्यावरून गोंधळ झाल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगितले जात आहे.दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र देण्यासाठी दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासह त्यांची नोंदणी केली जाते. यासाठी प्रत्येक आठवड्याला जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी होते. त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी दिव्यांग बांधवांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते व तसा संदेश दिव्यांगांना पाठविला जातो. त्यानंतर ठरवून दिलेल्या दिवशी दिव्यांग बांधव रुग्णालयात येतात. असे असले तरी ही प्रक्रिया पूर्ण करणे अजूनही ग्रामीण भागातील दिव्यांगांना शक्य होत नसल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे अजूनही जिल्हा रुग्णालयात दर आठवड्याला मोठी गर्दी होते. अशाच प्रकारे बुधवार, २५ रोजीदेखील पुन्हा गर्दी झाली.केस पेपर काढण्यासाठी फिरवाफिरवबुधवारी मोठी गर्दी झालेली असताना आलेल्या रुग्णांना केस पेपरसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविले जात होते. त्या मुळे प्रत्येकाला तीन-तीन ठिकाणी चकरा मारव्या लागल्या. एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जात असताना व एवढ्या प्रमाणातील प्रत्येक व्यक्तीला एकाका ठिकाणी थांबावे लागत असल्याने यात मोठा वेळ गेला. त्यामुळे सर्वच जणांची चांगलीच दमछाक झाली. एक तर अनेक जण पायाने अधू व त्यात ही फिरवाफिरव त्यामुळे दिव्यांगांचा व नातेवाईकांचा मोठा संताप झाला. दिव्यांग बांधवांना किमान एकाच ठिकाणी केस पेपर देऊन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी दिव्यांगांकडून केली जात होती.संताप अनावर झाल्याने उडाला गोंधळसकाळपासून रांगेत उभे असताना एक तर केस पेपर मिळत नसल्याने व तपासणी, इतर प्रक्रियेदरम्यान बराच वेळ जात असल्याने रांगेत उभे असलेले दिव्यांग बांधव उकाड्याने घामोघाम झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजेदरम्यान पाऊस सुरू झाल्याने दिव्यांगांचे मोठे हाल झाले. एवढा त्रास सहन करूनही केस पेपर मिळत नसल्याने मोठा वाद उद््भवला. त्यात काही जण केस पेपर काढत अललेल्या ठिकाणी घुसल्याने त्यांना रोखत असताना चांगलाच गोंधळ उडाला. या ठिकाणी हाणामारी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा आरोपप्रमाणपत्रासाठी तपासणी व इतर प्रक्रियेसाठी सकाळी ८ ते दुपारी १२ अशी वेळ असताना प्रत्यक्षात डॉक्टर व संबंधित कर्मचारी वेळेवर येत नसल्याने आलेल्या सर्व दिव्यांगांची प्रक्रिया पूर्ण होत नाही व दर आठवड्याला गर्दी वाढतच जाते. त्यामुळे हा गोंधळ वाढत असल्याचे दिव्यांगांचे म्हणणे आहे. २५ रोजीदेखील ५० ते ६० जण रांगेत उभे असताना केस पेपर देणे बंद करण्यासह तपासणीही थांबविण्यात आल्याने अधिकच गोंधळ वाढला. दर आठवड्याला पुरेसा वेळ दिला व आलेल्या सर्व दिव्यांगांची प्रक्रिया पूर्ण केली तर वाद होणार नाही, असेही सांगितले जात आहे.पहाटेपासून रांगादर बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधव पहाटे ५ वाजेपासूनच येऊन थांबतात. हळूहळू ही गर्दी वाढत जाऊन मोठी रांग लागते. बुधवार, २५ रोजी तर अपेक्षापेक्षा जास्त गर्दी वाढली व अर्धा कि.मी.पर्यंत रांग लागली होती. पुरेसे कर्मचारी व ठरवून दिलेला पूर्ण वेळ देऊन दर आठवड्याला दिव्यांगांचे होणारे हे थांबविण्यात यावे, अशी मागणी दिव्यांग बांधवांतर्फे केली जात आहे.राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेपप्रमाणपत्र प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ््या राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कायकर्ते येऊन वेगवेगळ््या पुढाऱ्यांचे नावे सांगतात व प्रमाणपत्रासाठी आग्रह करतात. त्यामुळेही गर्दी वाढून गोंधळ होत असल्याचे काही जणांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप थांबविण्यात यावा, अशीही मागणी केली जात आहे.बुधवार, २५ रोजी अपेक्षापेक्षा जास्त लाभार्थी आल्याने मोठी गर्दी झाली होती. असे असले तरी नियमात बसणाºयांची तपासणी करण्यात येऊन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जास्त लाभार्थी आल्याने ठराविक वेळेपेक्षा जास्तवेळ प्रक्रिया चालली. पुरेसे कर्मचारीदेखील होते. मात्र गर्दी वाढल्याने रांगेतून काही जण पुढे जात असल्याने गोंधळ झाला.- डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक.दिव्यांगांची दर आठवड्याला मोठी गर्दी होते तरीदेखील पुरेसा वेळ दिला जात नसल्याने गर्दी वाढत जाते. २५ रोजी तर अनेकांना केसपेपरसाठी फिराफीर करावी लागली व ५० ते ६० जण बाकी असताना केस पेपर देणे बंद केले.- ज्ञानेश्वर पाटील, सचिव, तालुका दिव्यांग सेना, पारोळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव