शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

एकनाथराव खडसे यांच्या वक्तव्याने कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 12:52 IST

मनपा निवडणूक

ठळक मुद्देगुपीत कोणते? यावरही शहरात दिवसभर तर्क-वितर्कभाजपात नेतृत्त्वाबाबत संभम्र

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - कोणत्याही निवडणुकीचे वेध लागल्यानंतर काही महिन्यांपूर्वी तयारी सुरु होते. आरोप-प्रत्यारोप, पक्षांतर, दबावतंत्र यासाऱ्या घटनाक्रमांना सुरुवात झाल्यानंतर निवडणुकीचे वारे सुरु झाले असे समजले जाते. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मनपाचे मोठे गुपीत असून उघड केल्यास १०० जण जेलमध्ये जातील असे पत्रकारांना काल सांगितले. मनपा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा भाग नाही ना? अशी चर्चा जळगावात रंगू लागली आहे.जळगाव महानगरपालिका निवडणूक म्हटली की घरकुल, वाघूर, जिल्हा बँक, गोलाणी मार्केट बांधकाम व अ‍ॅटलांटा प्रकरणी दाखल गुन्हे प्रचाराचे मुद्दे असतात.गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत देखील विरोधकांकडून याच मुद्यांचा वापर प्रचारात करण्यात आला होता.गत निवडणुकीच्या वेळी नोटीसामहापालिका निवडणूक किंवा विधानसभा निवडणूक ही घरकुलसह अन्य दाखल खटल्यांभोवती फिरत असते. निवडणूक सुरु होण्यापूर्वी तत्कालिन नगरसेवक व पदाधिकाºयांना वाघूर, अटलंटा या प्रकरणात नोटीस देखील बजावल्या होत्या.आता पुन्हा खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मनपाचे मोठे गुपीत असल्याची माहिती देवून खळबळ उडविली आहे. पत्रकारांना ही माहिती देवून त्यांनी दबावतंत्राचा तर हा भाग नाही ना? अशीही चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांकडे मनपाचे कोणते मोठे गुपीत आहे, याबाबतही आज शहरात मनपा व राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती.क्लिनचिटनंतर लक्ष वेधण्याचा प्रयत्नमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी भुखंड प्रकरणी काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लिनचिट दिली आहे. दरम्यानच्या काळात कर्नाटकात भाजपाला नामुष्की सहन करावी लागली आहे.आगामी काळात होणाºया मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्याचा तर हा प्रयत्न खडसेंचा प्रयत्न नाही ना? असाही सूर उमटत आहे.दोन वर्ष वाया गेल्याचे शल्यआपला सुरेशदादा यांच्यासोबत नव्हे तर प्रवृत्ती विरोधात लढा असल्याचे खडसे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. संघर्ष करणे हा खडसे यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच त्यांनी युती तोडण्याच्या निर्णयापासून ते स्वकियांविरोधात आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. मात्र यासाºयात त्यांच्यावर दाऊदच्या पत्नीसोबत संभाषण, भोसरी येथील भूखंड प्रकरणात आरोप झाले. त्यामुळे त्यांना मंत्रीपद गमवावे लागले. महत्त्वाची दोन वर्षे वाया गेल्याचे शल्य त्यांच्या मनात कायम आहे.भाजपात नेतृत्त्वाबाबत संभम्रमहानगरपालिका निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आहे. असे असतानाही महापालिकेसाठी भाजपातर्फे कोण नेतृत्त्व करणार हे निश्चित नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पालघर निवडणुकीत व्यस्त आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची विशेष जबाबदारी असल्याने त्यांच्याकडे जळगाव महापालिकेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या निवडणुकीवेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रकृतीची तमा न बाळगता निवडणूक मैदानात उडी घेतली होती. सध्यस्थितीला खडसे यांच्या म्हणण्यानुसार जिल्हाध्यक्ष किंवा पक्षनेतृत्त्वाने मनपा निवडणुकीबाबत चर्चा केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वातावरण निर्मिती करण्याचा तर हा प्रयत्न नाही?

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव