स्वप्नील रडे यांची निवड
जळगाव : अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या शहर युवाध्यक्षपदी स्वप्नील रडे यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याहस्ते रडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस समितीची जळगावात स्थापना
जळगाव : ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस समितीची नुकतीच जळगावात स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी नईम मेमन, उपाध्यक्ष कल्पेश छेडा, सचिव सय्यद शाहीद, कार्याध्यक्ष मुख्ताख बादलीवाला, कोषाध्यक्ष बशिर राणाणी, जाबीर शेख, राजू मेशरी यांची निवड आदी पदाधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे.
महाकवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव : महाराष्ट्राचे महाकवी तथा भीमशाहीर वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खरात गट)तर्फे १ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनजवळ वामन कर्डक यांना आदरांजली वाहण्यात येणार असून, यावेळी भीमगीते, शाहीर आदी कार्यक्रमही होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष जे.डी. भालेराव यांनी कळविले आहे.
केरळ व कर्नाटकमध्ये जाणाऱ्यांना आरटीपीसीआर आवश्यक
जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून रेल्वेद्वारे केरळ व कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत नेणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोनाचे दोन डोस घेतले असले तरी, संबंधित ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असल्यावरच संबंधित शहरात प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.