शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

भुसावळ येथे बहिणाबाई महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:18 IST

भुसावळ , जि.जळगाव : सामाजिक , शेती, राजकारणात महिलांनी भरीव कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. तसेच बचत गटांनी राजकारण न ...

ठळक मुद्देबचत गटांनी राजकारण न करता उत्पन्न वाढवावे- दिलीप कांबळेपाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवात बचत गटांची हजारोंची उलाढालबहिणाबाई महोत्सव इतरही ठिकाणी आयोजित करण्याच्या मान्यवरांनी आयोजकांना केल्या सूचना

भुसावळ, जि.जळगाव : सामाजिक, शेती, राजकारणात महिलांनी भरीव कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. तसेच बचत गटांनी राजकारण न करता, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी सायंकाळी येथे केले.ते येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित बहिणाबाई महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, गुरुनाथ फाऊंडेशनच्या अध्यक्षा खासदार रक्षा खडसे, महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार हरिभाऊ जावळे, भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, आमदार चैनसुख संचेती, महापौर सीमा भोेळे, माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, प्रांत डॉ.श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, दीपनगरचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, डीवायएसपी गजानन राठोड, उद्योगपती मनोज बियाणी, पं.स. सभापती प्रीती पाटील, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, डीआरडीएचे शिरसाठ, कृषि अधिकारी भोकरे आदी उपस्थित होते.कांबळे म्हणाले की, ४० वर्षात एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली हजारो, लाखो कार्यकर्ते काम करीत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार, खासदार काम करीत आहे. ते सर्वांना भक्कम पाठबळ देत आहेत. चांगल्या कामांना त्यांचा नेहमीच आशीर्वाद असतो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन होत आहे. या महोत्सवाचे आयोजन जळगाव, भुसावळप्रमाणे इतर ठिकाणीही घेण्यात यावे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंकजा मुंढे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार यांच्या माध्यमातून बचत गटांना लाभ मिळतीलच. यासाठी आपण ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.प्रास्ताविक बहिणाबाई महोत्सवाच्या आयोजक खासदार रक्षा खडसे यांनी केले. या महोत्सवात गेल्या पाच दिवसात प्रत्येक स्टॉलने १५ ते ६० हजार रुपयांवर विक्री केली आहे. तसेच बचत गटांना दिशा देणारा हा कार्यक्रम असल्याचे सांगितले.गौरव- गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या या महोत्सवातील विविध सांस्कृृतिक कार्यक्रमांतून कलाविष्कार सादर करणाऱ्या कलाकारांना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.खासदार दत्तक गावाचा सत्कार- खासदार रक्षा खडसे यांनी दत्तक घेतलेले हातेड, ता.चोपडा या स्मार्ट व्हिलेज गावातील विकास सोसायटीने खान्देशात प्रथक क्रमांक पटकावल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महोत्सवाच्या आयोजनात सहकार्य कारणाºया सर्वांचा सत्कार करण्यात आला.उत्सुकता अणि जल्लोश- प्रसिद्ध पार्श्वगायक आदर्श शिंदे यांचा सीने गीत गायनाच्या कार्यक्रमाला शहरासह परिसरातील तरुण, तरुणींनीसह सर्वच वयोगटातील रसिकांनी हजेरी लावून मोठ्या उत्साहात व जल्लोषात गायक आदर्श शिंदे याची झलक बघण्यासाठी तरुणाईची हजारोंच्या संख्येने गर्दी खेचली होती. यावेळी गायक आदर्श शिंदे यांचा गुरुनाथ फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.खासदारांच्या जीवनावर गीत- कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे यांच्या जीवनावर अहिल्यादेवी होळकर व खासदार रक्षा खडसे यांच्या आयुष्यातील साम्य कथन करणारे गीत कुणाल बोदडे व प्रकाश बोदडे यांनी यावेळी सादर केले.सूत्रसंचालन महोत्सव प्रमुख प्रा.सुनील नेवे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, संकेत नेवे यांनी, तर आभार महोत्सव कार्याध्यक्ष तथा नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ