शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भावभोळया भक्तीची ही एक तारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 23:17 IST

मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ...

मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ते फक्त काही मागण्यासाठी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला मीच स्वरा अपराधी.... या भक्ती गीतात सांगितल्याप्रमाणे मनात भक्ती भाव न ठेवता फक्त देवाने इच्छा पूर्ण करावी हाच ध्यास मनुष्य घेत असतो. खरं तर भगवंत भाव, भक्तीचाच भुकेला आहे. जो कोणी त्याला शुद्ध अत:करणाने अर्पण करतो ते तो आनंदाने स्वीकारतो. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगितले आहे.शबरीने भक्ती पूर्वक अर्पण केलेली बोर रामाने मोठ्या आवडीने स्वीकार करून खाल्ले. इतकेच काय तर रिकामे झालेल्या अक्षय पात्रातून उरलेल्या भाजीचा एक कण खाऊन भगवंतांनी ऋतू कालोत्स पुष्पाणी समर्पयामी, असे म्हणून त्या-त्या ऋतूत आलेल कोणतेही फुल भगवंताला अर्पण केले तरी भगवंत ते फुुल आनंदाने स्वीकरतो.भगवंताला काहीच नाही तर रोज पाणी जरी अर्पण केले तरी तो ते आनंदाने स्वीकारतो, पण त्यात भक्ताची भाव भक्ती असायला हवी. सुदामाने आणलेली पोहयाची गाठोडी घेऊन त्या भक्तीच्या पोह्याची गाठ भगवंतांनी स्वत:च्या हाताने सोडली आणि मुठभर पोहे खाऊन तृप्त झाले, अशी अनेक उदाहरणे देता येतील जी भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. मनुष्याने स्वार्थ सोडून जगाच्या कल्याणाचा विचार करून भगवंत भक्ती केल्यास मनुष्याचा स्वत:चा उत्कर्ष होईल. अनेक महात्मा लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा ज्ञानरूपी प्रकाश जेवढ्यांना देता येईल. त्यांनाही ही ऊर्जा आणि प्रेरणा द्यायची आहे. आपल्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये व्यवहारांमध्ये अंगीकार करून, गोड वाणीद्वारे कोणाचे मन न दुखवता ही प्रेरणा दिली पाहिजे.-नाना महाराज कुलकर्णी,  पिंप्राळा

टॅग्स :Jalgaonजळगाव