शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहूरच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:34 IST

वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ३२ कोटी ४३ लाख ८४ हजार आठशे साठ एवढ्या निधीचा प्रकल्प अहवाल दाखल केला आहे. यासंदर्भात पेठ व कसबे गावातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या झळापेठ व कसबे ग्रामपंचायतीकडून साडेबत्तीस कोटींचा प्रकल्प अहवाल दाखल

मनोज जोशीपहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ३२ कोटी ४३ लाख ८४ हजार आठशे साठ एवढ्या निधीचा प्रकल्प अहवाल दाखल केला आहे. यासंदर्भात पेठ व कसबे गावातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.पहूर गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पहूर पेठ व कसबे सामुदायिक पाणीपुरवठा समिती गठित झाली आहे. २०१५ पासून शासनस्तरावर समीतीच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. यासाठी पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे प्रकल्प अहवाल सादर केला आहे. औरंगाबाद येथील अभियंता समीर जोशी यांच्याकडून दोन्ही गावात सर्वेक्षणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.स्वतंत्र शाखा अभियंता नियुक्ती ची मागणीया प्रकल्पाचे काम वेगाने होण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे स्वतंत्र शाखा अभियंता यांची नियुक्ती करण्याची मागणी समिती अध्यक्ष बाबूराव घोंगडे, उपाध्यक्षा तथा पेठ येथील सरपंच नीता रामेश्वर पाटील, कसबे येथील सरपंच ज्योती शंकर घोंगडे, सचिव अरूण घोलप, उपसरपंच श्यामराव सावळे, उपसरपंच योगेश भडांगे, बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख, रामेश्वर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, दौलत घोलप, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, माजी सभापती प्रदीप लोढा, विवेक जाधव, पुंडलिक भडांगे, अ‍ॅड. एस.आर पाटील, अर्जुन लाहसे या समिती सदस्यांनी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.पाणीटंचाईच्या झळादरवर्षी पहूर गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदा जून अर्धा होऊनही वरूणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. मोतीआई धरणाच्या मृत साठ्यातून अल्पसा शिल्लक पाणीसाठ्यातून कसबे व पेठ गावाची तहान भागविताना ग्रामपंचायतींना दमछाक करावी लागत आहे. वेळेप्रसंगी छोट्या मोठ्या वादाच्या घटनांना दोन्ही गावच्या सरपंचाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेही महत्वाकांक्षी योजना लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वाघूर धरणावरून पेठ व कसबे गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी समीतीच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, दोन्ही गावांतील सर्वेक्षणाचे कामपूर्ण केले आहे. त्याचबरोबर दोन्ही ग्रामपंचायतीकडून ३२ कोटी ४३ लाख निधीच्या प्रकल्पाचा अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे नुकताच दाखल केला आहे. या योजनेचे काम जलद गतीने होण्याकरिता स्वतंत्र शाखा अभियंता यांची नियुक्तीची मागणी समीतीकडून केली आहे. यासाठी जलसंपदा मंत्र्यांनीही मुख्य अभियंता नाशिक यांना आदेशित करून तातडीने नियुक्तीच्या सूचना दिल्या आहेत. -बाबूराव घोंगडे, पेठ व कसबे सामूहिक पाणीपुरवठा समिती, अध्यक्ष, पहूर 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJamnerजामनेर