शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरच्या हॉटस्पॉट झोनमध्ये पूर्णत: संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:43 IST

अत्यावश्यक वस्तू घरपोच : मयत संशयितांच्या नातेवाईकांना केले क्वारंटाईन

अमळनेर : शहरात कोरोणचे रुग्ण वाढत चालल्याने त्याचा प्रसार थांबवण्यासाठी आरोग्य विभागाने कठोर पावले उचलली असून मयत संशयित रुग्णांचा अहवाल आला नसला तरी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असून अक्षयतृतीयाच्या दिवशी देखील हॉटस्पॉट झोन मध्ये सर्व्हे करण्यात आला. दरम्यान या झोनमध्यजे पूर्णत: संचारबंदी करण्यात आली आहे. तर २६ रोजी सकाळी नव्याने कोणताही अहवाल न आल्याने शहरार नागरिकांनी सुखाने अक्षयतृतीयचा आनंद घेतला.शहरातील तांबेपुरा , सानेनगर व अमलेश्वर नगर भागातील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यांना प्रथमदर्शनी कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने व श्वास घेण्यास , खोकल्याचा व तापाचा त्रास होत होता म्हणून संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी रवाना केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र अहवाल बाकी असला तरी शक्यता गृहीत धरून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रताप हॉस्टेल आणि आंबेडकर वसतिगृहात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यामुळे संभाव्य संसगार्चा धोका कमी होणार आहेमृत रुग्णांच्या संपर्कातील १९ लोकांचे नमुने घेतलेदरम्यान साळीवाड्यातील कोरोना पॉझिटिव्ह मृत महिलेच्या संपर्कातील अजून ७ जण व शाह आलम नगर भागातील कोरोना पॉझिटिव्ह मृत इसमाच्या संपर्कातील १२ जणांना स्वॅब घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. आतापर्यंत रुग्णांच्या संपर्कातील ४० जणांना तपासणी साठी रवाना करण्यात आले आहेमठगव्हान येथील एका व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आणि तो एका डॉक्टरच्या संपर्कात होता म्हणून त्याला तपासणी साठी रवाना करण्यात आले. तर शनिवारी पाठवलेल्या तीन व्यक्तींपैकी एकाला परत पाठवण्यात आले आहे. कोरोना पोझीटिव्ह मयत आणि संशयित मयत रुग्णांच्या गल्ल्या बॅरॅकेट्स लावून सील करण्यात आल्या आहेत आरोग्य सेविका, आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविकांमार्फत दररोज सर्व्हे सुरू आहे. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुखायधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी नागरिकाना घराबाहेर येण्यास मनाई केली असून त्यांना दूध , किराणा , भाजीपाला घरपोच देण्याची तयारी दर्शवली आहे. किराणा दुकांदारांचे नंबर्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत.प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी विलास महाजन , पोलीस निरीक्षक अंबादास मोरे सतर्क असून उपाययोजना व नियोजन करीत आहेत