भंगाळे यांनी दिनांक २५ ऑगस्ट रोजी यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना पाठवलेल्या तक्रार पत्रात म्हटले आहे की, आदिवासी क्षेत्रातील आदिवासी वस्ती, पाड्यांवर मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी आदिवासींना शासनाच्या वतीने मिळणारे खावटी कर्जवाटप करण्यात येत आहे; परंतु या कार्यक्रमांचे आयोजन करताना स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांना एकात्मिक कार्यालयाच्या कुठलीही सूचना किंवा माहिती न देता कर्जवाटपाचे कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे यावल पंचायत समितीच्या मागील मासिक सर्वसाधारण सभेत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी हजर असताना या वेळी पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी, उपसभापती व सदस्यांनी त्यांना शासनाच्या प्रॉटोकॉलविषयी जाणीव करून दिली व आपली नाराजी व्वक्त केली होती. दरम्यान उपसभापती योगेश दिलीप भंगाळे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
खावटी कर्जवाटप कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST