शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

एरंडोल पोलीस निरीक्षक व सावकाराविरुध्द मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 16:12 IST

वरखेडी, ता.एरंडोल येथील भिकन दगडू पाटील (वय ५५) या शेतकºयाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सावकार व एरंडोल पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत भावलाल हिलाल पाटील (रा.वरखेडी, ता.एरंडोल) यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्दे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ  जाचामुळे झाला होता शेतक-याचा मृत्यूयापूर्वी सावकारीचा गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९ :  वरखेडी, ता.एरंडोल येथील भिकन दगडू पाटील (वय ५५) या शेतकºयाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सावकार व एरंडोल पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत भावलाल हिलाल पाटील (रा.वरखेडी, ता.एरंडोल) यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.सावकार, त्याचे सहकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडून सातत्याने येणा-या दबावामुळे भिकन दगडू पाटील (वय ५५, रा.वरखेडी, ता.एरंडोल) या शेतक-याचा २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. दरम्यान, त्रास देणा-या या सर्व लोकांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा गावक-यांनी त्यावेळी घेतला होता, मात्र काही लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्याने अंत्यसंस्कार झाले होते. भिकन पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने भावलाल पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयात जावून मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली.काय आहे प्रकरणभिकन पाटील यांनी बंडू युवराज पाटील (रा.तळई, ता.एरंडोल ह.मु.भिवंडी) यांच्याकडून व्याजाने ६० हजार रुपये घेतले होते. या रकमेचे ४० हजार रुपये व्याज व मुद्दल ६० हजार असे एक लाख रुपये परत केल्यानंतरही त्यांच्याकडून व्याजासाठी धमक्या दिल्या जात होती. या प्रकरणाची सहकार विभागाकडे तक्रार केल्यानंतर सावकार बंडू पाटील, पत्नी अलका पाटील व मुलगा ज्ञानेश्वर पाटील यांच्याविरुध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही सावकाराचा जाच सुरुच होता.अशातच त्यांचा रक्तदाब वाढून मेंदूची रक्तवाहीनी तुटली. त्यामुळे त्यांना जळगाव व त्यानंतर मुंबई येथे दाखल करण्यात आले. तेथे ते कोमात गेले. घरी आणल्यानंतर त्यांचा सोमवारी रक्तदाब वाढून मृत्यू झाला. या काळात सावकार बंडू पाटील, दत्तू पाटील (आडगाव, ता.एरंडोल), पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे व ज्ञानेश्वर पाटील यांनी पैसे देण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.