शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे माजी आमदार संतोष चौधरींविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:15 IST

साकेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तुझा भाऊ असेल तेथून त्याला बोलावून आण व मी सांगेल त्या उमेदवाराला मतदान करायला सांग, अशी धमकी माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिल्याची तक्रार विनोद प्रताप ठाकरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दाखल केली होती. दरम्यान, नंतर अर्जदाराने आपला अर्ज मागे घेतला असल्याचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी सांगितले.

ठळक मुद्देमी सांगेल त्या उमेदवाराला मतदान करायला सांग, अशी धमकी दिल्याचा आरोपसंबंधिताची चौकशी करून कारवाईची मागणीआमच्या जीवितास धोका असल्याचे तक्रारीत नमूद

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तुझा भाऊ असेल तेथून त्याला बोलावून आण व मी सांगेल त्या उमेदवाराला मतदान करायला सांग, अशी धमकी माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिल्याची तक्रार विनोद प्रताप ठाकरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दाखल केली होती. दरम्यान, नंतर अर्जदाराने आपला अर्ज मागे घेतला असल्याचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी सांगितले.दरम्यान, माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी संपर्क केला असता साकेगाव सरपंच पदासाठी त्यांची मर्जी असेल तो सदस्य त्या उमेदवाराला मतदान करेल. माझा काही संबंध नाही व मी कोणासही धमकी दिली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे लहान दुकानाची जागा माझी असल्यामुळे मी त्या दुकानाच्या चाव्या मागितल्या. त्यांनी स्वत:हून आणून दिल्या, असे त्यांनी सांगितले.साकेगाव सरपंचपदाची निवडणूक गुरुवारी ११ रोजी होत आहे. निवडणुकीसाठी माझे मोठे बंधू आनंद ठाकरे ग्रा.पं.सदस्य असून ते बाहेरगावी गेले आहे, असे ठाकरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तुझ्या भावाला मी सांगेल त्याच ठिकाणी मतदान करायला सांग व त्यास घरी बोलावून घे, असे चौधरी फोनवरून वारंवार सांगत होते. दरम्यान, मी फोन बंद केल्यानंतर ते माझ्या भुसावळ येथील जामनेर रोडवरील दुकानात येऊन शिवीगाळ करून माझे दुकान बंद करून दुकानाच्या किल्ल्या घेऊन गेले, तर छत्रपती शिवाजी महाराज दुकानातील दुसरे दुकानही ताब्यात घेण्याची धमकी दिली. ९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास येथील एक नगरसेवक व काही गुंड प्रवृत्तीचे लोकही घरी येऊन गेल्याचे तक्रारमध्ये नमूद करण्यात आले आहे. या लोकांनी माझ्या भावाविषयी चौकशी करून तसेच महिलांना धमकावल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. संबंधिताची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच माजी आ.चौधरी यांच्यापासून आमच्या जीवितास धोका असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या दरम्यान, अर्जदाराने आपला अर्ज १० मिनिटातच मागे घेतला असल्याचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ