शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-मुंबई विमानसेवेचे संकेतस्थळावर तिकीटच मिळेना, लिंकच नसल्याने अडचण असल्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 12:54 IST

अनेकांचा हिरमोड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15-  जळगावातून विमानसेवेचे स्वप्न पूर्णत्वास येण्याचे दिसून येत असेल तरी विमानाचे तिकीट मिळत नसल्याने गुरुवारी अनेकांचा हिरमोड झाला. तिकीट मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नसल्याचे सांगण्यात आले. जळगाव येथून 23 डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा झाली व यामुळे व्यापारी, उद्योजक तसेच सर्वानाच फायदा होणार असल्याने याचा आनंद झाला. अनेकांनी 23 रोजी पहिल्याच दिवसाचे तर काहींनी त्यानंतरच्या तारखांचे तिकीट काढण्यासाठी एअर डेक्कन कंपनीच्या संकेतस्थळावरून प्रयत्न केले. मात्र ब:याच प्रयत्नानंतरही तिकीट मिळाले नाही. त्यामुळे सर्वाचा हिरमोड झाला. 

जळगावातून विमानसेवा सुरू होण्याचा आनंद आहे. 23 रोजी जळगाव ते मुंबईचे तिकीट काढायचे होते. यासाठी गुरुवारी आपण एअर डेक्कन कंपनीच्या संकेतस्थळावरून तिकीट मिळविण्याचा प्रयत्ने केला. मात्र संकेतस्थळ खुले होत असले तरी तिकीटाबाबतची लिंक नाही की काहीही माहिती नाही. त्यामुळे तिकीट मिळून शकले नाही. यासाठी कंपनीचे टोल फ्री क्रमांक शोधून त्यावर संपर्क साधला असता काही क्रमांक चुकीचे लागले तर काही क्रमांक लागलेच नाही. सेवा सुरू होणार असेल तर  तिकीट मिळण्याची सोय करणे आवश्यक आहे. - पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ.