शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

25 कोटींची कामे ठरविणार समिती

By admin | Updated: March 17, 2017 00:28 IST

नगरविकास विभागातर्फे परिपत्रक जारी : मनपाने पाठविलेला प्रस्ताव बारगळला

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी जाहीर केलेल्या 25 कोटीच्या निधीसाठी मनपाने पाठविलेला प्रस्ताव आमदार सुरेश भोळे यांच्या मागणीवरून अडगळीत टाकत या निधीतून कामे करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. समितीलाच कामे कोणामार्फत करावीत, हे ठरविण्याचे अधिकार असून आमदार भोळे यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे करण्याची विनंती पालकमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे केली आहे. निधी 31 मार्च  2018 र्पयत खर्च     करावा लागणार15 मार्च रोजी देखील आमदार सुरेश भोळे व चंदूलाल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनी तत्काळ 25 कोटींचा निधी महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत जळगाव महानगरपालिकेस वितरीत करण्याचे मंजूर केले. शासनाच्या नगरविकास विभागामार्फत तसे परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. जळगाव शहर मतदार संघासाठी मंजूर झालेला निधी 31 मार्च 2018 पूर्वी खर्च करावयाचा असून त्या माध्यमातून शहरातील प्रमुख गटारी, रस्ते, लहान पूल आणि इतर मुलभूत सुविधांचीच कामे करावयाची आहेत.भेदभाव केला नाही -आमदार भोळेयाबाबत आमदार सुरेश भोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मनपातील सत्ताधा:यांनी 25 कोटीचा प्रस्ताव पाठविताना विश्वासात घेतले नाही. वास्तविक या निधीसाठी आम्ही पाठपुरावा केला होता. जर तो प्रस्ताव पाठविण्यापूर्वी दाखविला असता तर  त्या प्रस्ताव एक-दोन बदल सुचविले असते व आज ही वेळ आली नसती.  मात्र आधी झालेल्या रस्त्यांची कामे त्यात घेण्यात आलेली होती. डी-मार्टचा रस्ता किंवा असेच काही रस्ते समाविष्ट केलेले होते. मात्र आजही अनेक कॉलनी एरियात रस्ते, गटारी, पाणी आदी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. 60 टक्के गटारी झालेल्या नाहीत. त्यामुळे हे नागरिक ‘आम्ही कर भरत नाहीत का?’ म्हणून जाब विचारतात. तरीही त्याचे दखल घेतली जात नव्हती. मनपाला सांगूनही सहकार्य मिळत नाही. साधे खड्डे देखील बुजवत नाहीत. त्यामुळे 25 कोटीच्या निधीतून आता कॉलनी भागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठय़ाची कामे समाविष्ट असतील. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सव्र्हे करून प्रस्ताव आधीच दिला आहे. त्यात कोणत्याही पक्षाचा नगरसेवक असला तरीही भेदभाव केलेला नाही. त्यात आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे काही बदल असल्यास ते सुचवतील. महापौरांना विनंती आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही. विविध प्रश्नांवर बसून चर्चा करून निर्णय घेता येतील.  मनपाने सुचविलेली कामे दुस:या टप्प्यातआमदार भोळे म्हणाले की, मनपाने पाठविलेला प्रस्ताव रद्द केलेला नाही. त्यातील काही कामे या प्रस्तावात घेतली जातील. तसेच मुख्यमंत्र्यांनी आणखी 25 कोटीचा निधी यानंतर देण्याचे मान्य केले आहे. त्यात उर्वरीत कामे घेतली जातील, असे सांगितले.  मनपाने हगणदरीमुक्तीचा केलेला दावा खोटा आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.