शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काळात एकही कारवाई न करणारे उत्पादन शुल्क अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:55 IST

मनपा निवडणूक अवघ्या १९ दिवसांवर येवून ठेपली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्याचा वापर होण्याची शक्यता असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र एकही कारवाई न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी अधीक्षकांना धारेवर धरले.

ठळक मुद्देसध्याच्या मतदार यादीत बदल करु नकाराज्य उत्पादन शुल्काचे ‘आढाव’ यांचा घेतला आढावाउमेदवाराच्या खर्चाच्या नियोजनाची जबाबदारी केवळ सहा पथकांवर

जळगाव - मनपा निवडणूक अवघ्या १९ दिवसांवर येवून ठेपली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्याचा वापर होण्याची शक्यता असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र एकही कारवाई न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी अधीक्षकांना धारेवर धरले.मनपाच्या ७५ जागांसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, मनपा आयुक्त व मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत डांगे हे उपस्थित होते. तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकाºयांसह वन विभागाचे अधिकारी, राज्य परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, बॅँक व महसूल विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.राज्य उत्पादन शुल्काचे ‘आढाव’ यांचा घेतला आढावाचन्ने यांनी राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक एस.एल.आढावा यांचा खरपुस समाचार घेतला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एक ही कारवाई का झाली नाही ? असा प्रश्न चन्ने यांनी विचारला. त्यावर आढाव यांच्याकडून कोणतेही अपेक्षित उत्तर मिळाले नाही. आगामी नियोजनाबाबत देखील आढाव यांनी अपेक्षित उत्तर न दिल्याने चन्ने यांनी आढाव यांना चांगलेच धारेवर धरत आतापर्यंतच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्यापासूनच सर्व हॉटेल, बियर बार मधील मद्याच्या विक्रीचा आढावा घेण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या. यासह पोलीस विभागाकडून देखील चन्ने यांनी निवडणुकीचा आढावा घेतला.सध्याच्या मतदार यादीत बदल करु नकामतपत्रिकेचे वाटप करताना अ‍ॅपचे वापर करण्याचा सूचना चन्ने यांनी दिल्या. तसेच अंतीम मतदार यादीमध्ये काही चुका असतील तर त्या आता बदल करू नका कारण आता बदल केल्यास घोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचा मतदार यादीवरच निवडणूका घ्या अशा सूचना चन्ने यांनी दिल्या. मतपत्रिका मतदारांपर्यंत पोहचल्या की नाही ? हे पाहण्याची जबाबदारी मनपा प्रशासनासह सर्वच निवडणूक निर्णय अधिकाºयांचीही असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावElectionनिवडणूक