शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य क्षेत्रास प्रोत्साहन देण्यात शासन व जनता उदासीन - एकनाथराव खडसे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:36 IST

ओबीसी साहित्य संमेलन उत्साहात

जळगाव : वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी साहित्य व साहित्यिकांना प्रोत्साहनाची आवश्यकता असताना दुर्दैवाने शासन व जनता हे दोन्ही घटक याप्रश्नी उदासीन आहेत अशी टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी येथे आयोजित पहिल्या ओबीसी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना केली.ओबीसी फाउंडेशन आॅफ इंडिया आयोजित पहिल्या राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलनाचे शहरातील कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा डॉ. महालक्ष्मी मोराळे, महापौर सिमा भोळे, साहित्यिक प्रभाकर श्रावण चौधरी, दिवाकर चौधरी, आत्माराम माळी, स्वाती मोराळे, उद्योजक चंद्रकांत बेंडाळे, रत्नाकर मोराळे, तुषार वाघुळदे आदी होते. संमेलनाची सुरूवात सकाळी ८.३० वाजता ग्रंथ दिंडीने झाली.बस स्थानकाजवळील चिमुकले राममंदिरापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. दिंडीतील ग्रंथराज ज्ञानेश्वरीसह २० ग्रंथांचे पूजन झाले. मेहरूण मधील श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे लेझीम पथक दिंडीत सहभागी झाले होते. सभागृहात खडसे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन झाले.मान्यवरांचा सत्कारसाहित्य क्षेत्रात योगदान असलेल्या सतीश कुबेर (धुळे), डॉ. किसन पाटील, डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी, प्रा. लतिका चौधरी (दोंडाईचा), डॉ. सतीश कराडे (नागपूर), गोकुळ बागुल, डॉ. प्रमोद महाजन, पांडुरंग सुतार, अभिनेत्री प्रियंका टोके (मुक्ताईनगर), डॉ. नितीन पाटील, प्रा. रमेश राठोड, प्रा. देवबा पाटील, डॉ.अभिजीत कवटकर आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.विविध सत्र उत्साहातओबीसी समाजाच्या प्रगतीत साहित्यिकांचे योगदान या विषयावर यावेळी परिसंवाद झाला यानंतर कथाकथन, गझल मुशायरा व कवीसंमेलनही यावेळी झाले. विविध सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन रत्नाकर मोराळे व तुषार वाघुळदे यांनी केले.मक्तेदारी संपलीएकनाथराव खडसे म्हणाले, राज्यात ५२ टक्के ओबीसी समाज आहे. ३४३ जाती-जमातींचा त्यात समावेश आहे. कला, संस्कृती साहित्य या क्षेत्रात एकेकाळी एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती. मात्र कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे काव्य अजरामर झाले, समाजाला एक दिशा देण्याचे काम या काव्याने केले. ओबीसी समाजातीलही अनेक व्यक्ती चांगले लिखाण करतात. या लिखाणाला लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न हे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होतात. मात्र साहित्य क्षेत्रावर आज सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या प्रभावामुळे मोठे परिणाम झाले आहे. साहित्यिकांच्या लिखाणाला प्रोत्साहन मिळावे, प्रतिसाद मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. दुर्दैवाने शासन, जनता नेमकी याबाबत उदासीन असल्याबद्दलची नाराजी खडसे यांनी व्यक्त केली. आज दलित, विद्रोही विविध भाषिकांचे साहित्य संमेलन होते त्यामागे केवळ एकच हेतू असतो की साहित्यिकाचे साहित्य हे जनतेसमोर यावे त्यातून जागृती व्हावी.साहित्य समाजाचा हुंकारसाहित्य हे समाजातून येत असते. समुहाचा हुंकार घेऊन समाजाचे जगणे बनते. तर कधी ज्ञानदेवासारखे विश्वाला शांतीचे मागणे मागते. साहित्य ही कुणाची मक्तेदारी नसते अनुभवातून साहित्याची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन स्वागताध्यक्षा डॉ. महालक्ष्मी मोराळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. ओबीसी समाजाने सामाजिक, शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या ओबीसींना आपल्या मानसिकतेत बदल करून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या संमेलनातून आपण साहित्य संस्कृती समृद्ध करत आहोत. आपल्या ज्ञाती बांधवांना सहकार्य करत आहोत, असेही त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव