शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावच्या आ. बं. विद्यालयाचे प्रांगण झळाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:25 IST

माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून शतकोत्तर शैक्षणिक वारसा असणाºया आ.बं.विद्यालयात सद्य:स्थितीत विविध विकास कामे सुरू असून, शाळेचे रुपडे आकर्षक होत आहे. नुकतेच शाळेच्या प्रांगणात सायंकाळी खेळाचा सराव करणाºया विद्यार्थ्यांसाठी हायमास्ट दिव्यांची व्यवस्थाही पूर्णत्वास गेली आहे.

ठळक मुद्देसायंकाळी खेळाचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हायमास्ट दिव्यांची सोययुवा उद्योजक योगेश अग्रवाल यांच्या हस्ते हायमास्ट दिव्यांचे लोकार्पणचाळीसगाव शिक्षण संस्था ही पंचक्रोशीची ज्ञान गंगोत्री

चाळीसगाव, जि.जळगाव : माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून शतकोत्तर शैक्षणिक वारसा असणाºया आ.बं.विद्यालयात सद्य:स्थितीत विविध विकास कामे सुरू असून, शाळेचे रुपडे आकर्षक होत आहे. नुकतेच शाळेच्या प्रांगणात सायंकाळी खेळाचा सराव करणाºया विद्यार्थ्यांसाठी हायमास्ट दिव्यांची व्यवस्थाही पूर्णत्वास गेली आहे. खासदार ए.टी.पाटील यांच्या खासदार निधीतून हायमास्ट दिवे बसविण्यात आले. संस्थेच्या बांधकाम समितीचे चेअरमन व युवा उद्योजक योगेश अग्रवाल यांच्या हस्ते दिव्यांचे लोकार्पण झाले. यामुळे आ.बं.विद्यालयाचे प्रांगण हायमास्ट दिव्यांच्या प्रकाशाने झळाळून निघाले आहे.विद्युत दिव्यांची सोय झाल्याने क्रीडा स्पर्धांसाठी सराव करणाºया विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. चाळीसगावशिक्षण संस्था ही पंचक्रोशीची ज्ञान गंगोत्री असून, आ.बं. विद्यालयाची इमारत ११० वर्षे जुनी असल्याने ऐतिहासिक वारसा म्हणून आम्ही तो जतन करणार आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेऊन शाळा परिसरात वेगवेगळ्या सुविधा पुरविण्यास इमारतीचे नूतनीकरण सुरु आहे. यासाठी माजी विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. संस्थेच्या मॅनेजिंग बोडार्चे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरू असल्याचे यावेळी योगेश अग्रवाल यांनी सांगितले.भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, संघटन सरचिटणीस प्रा.सुनील निकम, मुख्याध्यापिका निर्मला झोपे, प्रवीण राजपूत, पंकज साळुंखे, मनोहर सूर्यवंशी, दिनेश महाजन व इतर शिक्षक वृंदही उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव