शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तरुणाकडून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:36 IST

महाविद्यालयाला सुट्टी न दिल्याचे कारण : तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल नाही

जळगाव : ‘मविप्र’ संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांच्या निधनामुळे महाविद्यालयाला सुटी का दिली नाही, या कारणावरुन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी.देशमुख यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार सोमवारी महाविद्यालयात घडला. एका कार्यकर्त्याने धक्काबुक्की केली. मात्र प्राचार्यांनी तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.नरेंद्र पाटील यांचे रविवारी पुण्यात उपचार सुरु असताना निधन झाले. सोमवारी नेरी नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने तत्पूर्वी त्यांचे पार्थिव नूतन मराठा महाविद्यालाच्या प्रवेशद्वाजवळ आणण्यात आले होते. तेथे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम संपताच एका कार्यकर्त्याने महाविद्यालयाला सुटी का दिली नाही म्हणून प्राचार्य देशमुख यांच्याशी वाद घातला. यावेळी त्याने धक्काबुक्की केली. सुटी दिली असती तर विद्यार्थी आले नसते, त्याशिवाय रविवारी महाविद्यालयाला सुटी असल्याने शेकडो विद्यार्थ्यांना हा निरोप देणेही शक्य नव्हते. महाविद्यालय सुरु ठेवल्यामुळे सर्वच विद्यार्थी व प्राध्यापकांना आदरांजलीसाठी उपस्थित राहता आले.हा कार्यक्रम संपल्यानंतर सुटीच दिली जाणार असल्याचे स्पष्टीकरण प्राचार्यांनी दिले होते, तरीही हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला.ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्या निधनानंतर आम्ही सोमवारी सकाळी साडेसात वाजताच नूतन मराठा महाविद्यालयाला सुटी जाहिर केली होती. त्यानंतर श्रद्धांजली सभादेखील घेतली. अंत्ययात्रा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येणार असल्याने माझ्यासह सर्व कर्मचारी अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याठिकाणी एकत्र आलो. या दरम्यान काही जणांनी आपल्याला धक्काबुक्की केली. धक्काबुक्की कशसाठी आणि कुणी केली हे आपल्याला माहित नाही. या दरम्यान हल्लेखोरांनी प्रयोगशाळा साहाय्यक रवींद्र भागवत घुगे व शिपाई कैलास पाटील यांना देखील शिवीगाळ व मारहाण केली.- डॉ.एल.पी.देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव