शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मंगळग्रह मंदिरावर ‘नऊ’ अंकाचा योगायोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 01:14 IST

अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात नऊ फेब्रुवारीला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘नऊ’ चा धार्मिक धमाका पार पडला.

ठळक मुद्देसोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रत्यक्ष सहभागनऊ कुंडी यज्ञात ३६ जोडप्यांचा सहभाग

अमळनेर : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात नऊ फेब्रुवारीला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘नऊ’ चा धार्मिक धमाका पार पडला.नऊ हा श्री मंगळ ग्रहाचा शुभांक आहे. या पार्श्वभूमीवर नऊ फेब्रुवारी रोजी मंदिरासमोरील नियोजित पाच मजली भव्य इमारतीच्या तळ मजल्यावर नऊ कुंडी श्री गायत्री महायज्ञ झाला. या महायज्ञात ३६ जोडपे सहभागी होते . विशेष म्हणजे याच सुमुहूर्तावर श्री मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील नियोजित पाच मजली इमारतीच्या ६५़ ११५ फुटी स्लॅबच्या कामासही प्रारंभ झाला .शहरात अशा पध्दतीने पहिलाच धार्मिक विधी झाला. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रत्यक्ष सहभाग होता. अनेक मान्यवर पूर्णवेळ सोहळा पाहण्यासाठी तर अनेक भाविक यज्ञात आहुती टाकण्यासमयी उपस्थित होते. आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील हे देखील काही वेळ यज्ञविधित सहभागी झाले होते . तर जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. सर्व सहभागी भाविकांना नेते मंडळींनी शुभेच्छा दिल्या .मंगळ ग्रह सेवा संस्थेने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. पुष्पा भांडारकर, निवृत्त प्रा. सतीश सोनार , छोटूलाल शिंपी यांनी यज्ञविधीचे निरुपणासह संचालन केले. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी , तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गायत्री परिवाराच्या सुनेत्रा भांडारकर यांनी सहकार्य केले.तसेच संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन.पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, गोटू बडगुजर व मंदिरातील सेवेकऱ्यांनी यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.नऊ अंकाचाच होता बोलबाला...३६ या अंकातील तीन आणि सहाची बेरीज नऊ होते. ३६ जोडपे म्हणजे ७२ जण. ७२ या अंकातील सात आणि दोनची बेरीजही नऊ होते . शिवाय या महायज्ञास सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी प्रारंभ झाला. यातही आठ अधिक एकची बेरीज नऊ होते. अशा रीतीने नऊ तारीख, नऊ कुंडी यज्ञ , ३६ जोडपे, ७२ जण व आठ वाजून एक मिनिटांचा मुहूर्त असा एकूणच नऊ या शुभांकाचा आगळा-वेगळा व प्रथमच धार्मिक धमाका साजरा झाला.