शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सहकार राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाला महामार्गावर चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 12:47 IST

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे चुलत भाऊ राजू नारायण पाटील (वय ४२, रा.पाळधी, ता.धरणगाव) यांना महामार्गावर पाळधी बायपासवर अज्ञात वाहनाने उडविल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. रविवारी दुपारी याच महामार्गावर मुसळी फाट्यावर मेहरुणमधील जावेद शेख या तरुणाला चिरडले होते. या महामार्गावर सलग दुसरा अपघात आहे.

ठळक मुद्देपाळधी ‘बायपास’वर सलग दुसरा अपघात अज्ञात वाहनाने दिली दुचाकीला धडक
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१४ : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे चुलत भाऊ राजू नारायण पाटील (वय ४२, रा.पाळधी, ता.धरणगाव) यांना महामार्गावर पाळधी बायपासवर अज्ञात वाहनाने उडविल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. रविवारी दुपारी याच महामार्गावर मुसळी फाट्यावर मेहरुणमधील जावेद शेख या तरुणाला चिरडले होते. या महामार्गावर सलग दुसरा अपघात आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजू पाटील हे बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत चालक म्हणून कामाला होते. सोमवारी पहिल्या पाळीत ते ड्युटीला होते. ड्युटी आटोपून ते दुचाकीने (क्र.एम.एच.१९-२११३) जळगाव शहरात आले. काम आटोपल्यानंतर घरी जात असताना पाळधी गावात जाणाºया रस्त्यावर (बायपास) समोरुन येणाºया अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला तर दुचाकी लांब फेकली गेली. या अपघातात पाटील जागीच गतप्राण झाले.मुलाला दिली नाही मृत्यूची माहितीअपघात झाल्याचे समजताच जि.प.सदस्य प्रताप पाटील, राजू पाटील यांचा मुलगा गौरव व गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली. पाटील यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, राजू पाटील हे मयत झाले याबाबत त्यांच्या मुलाला माहितीदेणे टाळण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाटील यांच्या पश्चात पत्नी लताबाई, मुलगा गौरव, भाऊ शिवाजी असा परिवार आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.