शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

‘बीएचआर’वर कारवाईबाबत सहकार मंत्र्यांवरही दबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:43 IST

एकनाथराव खडसे यांचा गौप्यस्फोट

जळगाव : बीएचआर पतपेढीतील बेकायदेशीर व्यवहार, मनी लाँड्रींग व मालमत्तेची कमी दरात ठराविक लोकांकडून खरेदीकरून सुमारे हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याची तक्रार ठेवीदारांच्यावतीने करण्यात आली आहे. असे असले तरी बीएचआर पतपेढीवर कारवाई होत नसून या प्रकरणात खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरदेखील दबाब असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी जळगाव येथे केला. या प्रकरणी कारवाई सुरू झाल्यास किमान १०० ते १२५ दिग्गज मंडळी तुरुंगात जातील, असा दावा करीत त्यांची यादीही आपल्याकडे असल्याचे खडसे म्हणाले.बीएचआर पतपेढी ही मल्टीस्टेट पतपेढी असल्याने तिचे नियंत्रण हे केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. या पतपेढीतील गैरव्यवहाराची तक्रार ठेवीदारांच्यावतीने अ‍ॅड.कीर्ती रवींद्र पाटील यांनी थेट पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत या पतपेढीची ईडीमार्फत चौकशी करण्यासोबतच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फेही चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशांनंतरही कार्यवाही मात्र थंडबस्त्यात असल्याने व याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिल्याने या बाबत आश्चर्य व्यक्त करीत खडसे यांनी बुधवारी या विषयी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्राचे आदेश असतानाही सहकार मंत्री सुभाष देशमुख हे कारवाई करीत नसल्याने आपण त्यांची भेट घेऊन त्यांना या बाबत विचारले असता कारवाई करू शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे या प्रकरणात सहकार मंत्रीच दबावात असल्याचेही ते म्हणाले.इतकेच नव्हे तर पतसंस्थेचे प्रशासक जितेंद्र कंडारे यांच्याकडून पदभार काढण्याचे आदेश असताना त्यांना पाठिशी घातले जात असून अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बदलीची मागणी केली तरी त्यांची बदली होत नसल्याने यामध्ये किती दबाब आणला जात आहे, याचा अंदाज येऊ शकतो, असेही खडसे म्हणाले.१०० ते १२५ जण जातील तुरूंगातया प्रकरणाची चौकशी झाल्यास यात १०० ते १२५ दिग्गज तुरुंगात जातील असे सांगत त्यांची यादीही आपल्याकडे असल्याचे खडसे म्हणाले.‘महावीर अर्बन’ च्या संचालकांवर कारवाईश्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीने १७ वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा सहकारी बँकेकडून घेतलेले आठ कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याने व सदर कर्जाची हमी घेतलेल्या संचालकांनी दिलेल्या धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी बँक संबंधित १० संचालकांच्या मालमत्तेवर बोझा लावणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. या संचालकांमध्ये माजी आमदार मनीष ईश्वरलाल जैन यांचाही समावेश आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव