काकड आरतीला वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. आजही गावामध्ये कार्तिक स्नान, काकड आरती विशेष लक्षणीय ठरते. काकड आरतीनंतर टाळ, वीणा, मृदुंगाच्या गजरात तुकोबाच्या अभंगाचे गायन केले जाते. येथील श्री नाथ मंदिर येथे काकडा आरती कार्तिक मास समाप्तीनिमित्त ह.भ.प. दीपक महाराज शेळगावकर यांचे कीर्तन पार पडले. आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी समाप्ती कार्यक्रमाला उपस्थित राहत कीर्तनाच्या सुरुवातीला ह.भ.प. दीपक महाराज यांना पुष्पहार देऊन स्वागत केले.
===Photopath===
031220\03jal_2_03122020_12.jpg
===Caption===
दीपक महाराजांना पुष्पहार अर्पण करताना शिरीष चौधरी.