शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जळगाव जिल्हा बँकेची वार्षिक सभेत कर्जमाफीबाबत शासनाच्या अभिनंदनाच्या ठरावावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 20:53 IST

शासनाच्या अभिनंदनास सभासदांचा विरोध

ठळक मुद्दे आमदार एकनाथराव खडसेंच्या मध्यस्थीनंतर बहुमताने केला ठराव कर्जमाफीवरून खडसेंचा सरकारला घरचा आहेर पैसे भरले त्यांचा काय गुन्हा?

जळगाव: कर्जमाफी केल्याबद्दल राज्य शासनाच्या अभिनंदनाच्या मांडलेल्या ठरावावरून शुक्रवार, २८ रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १०२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. मोठ्या संख्येने सभासदांनी कर्जमाफीचा लाभच सगळ्यांना मिळालेला नसल्याने अभिनंदन कशासाठी असा सवाल केला. अखेर सभेचे अध्यक्ष असलेल्या माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. सुमारे १०-१५ मिनिटे चाललेल्या या विषयावरील वादामुळे सभेचे वातावरण चांगलेच तापले होते. मात्र कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना त्रास झाल्याचे सांगत खडसे यांनी शासनाला घरचा आहेर दिला.श्ुाक्रवार, २८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या इमारतीत सभागृहाच्या पार्र्कींगमध्ये मंडप टाकून झालेल्या या वार्षिक सभेस जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर अनुपस्थित असल्याने बँकेचे उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सभेचे अध्यक्षपद स्विकारावे असा प्रस्ताव मांडला. संजय पवार यांनी त्यास अनुमोदन दिले. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी विषयसुचीचे वाचन केले.शिवसेनेच्या आमदारांनी मांडला अभिनंदनाचा ठरावप्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शासनाने शेतकºयांची कर्जमाफी केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडला. मात्र ते बोलत असतानाच हा विषय ऐकून उपस्थित सभासदांपैकी अनेकांनी ओरडून नामंजूर असे सांगितले. त्यावर आमदार पाटील यांनी ‘मी विषय मांडला आहे. मंजूर करायचा की नाही ते तुम्ही ठराव’ असे सांगत प्रास्ताविक आटोपले. बँकेला २ कोटी ८८ लाखांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगितले.सभा सुरू असताना हा विषय चर्चेला आल्यावर मोठ्या संख्येने सभासदांनी शासनाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावास विरोध दशर््ाविला. त्यावर सभेचे अध्यक्ष असलेल्या खडसेंनी हस्तक्षेप करीत ठराव मंजूर असलेल्यांनी हात वर करा, असे सांगितले. लगेच सभेतील एका बाजूच्या सदस्यांनी हात वर केले. तर दुसºयाबाजूच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे खडसे यांनी प्रोत्साहनपर २५ हजार कोणाकोणाला मिळाले? दीड लाख कोणाला मिळाले? ओटीएसचा लाभ कोणाला मिळाला? याच्या याद्याच आमच्याकडे आहेत. अजून नवीन यादी येणार आहे. ज्यांना मिळाले, त्यांनी तर शासनाचे अभिनंदन केले पाहिजे. आणि या योजनेचा लाभ घ्या असाही शासनाचा आग्रह नाही. पैसे परत करून टाका, असे सुनावले. त्यावर सभासदांमधून ‘ही बँकेची योजना नाही’ असे उत्तर आले.कर्जमाफीवरून घरचा आहेरखडसे यांनी कर्जमाफी योजनेत शासनाने सरसकट लाभ द्यावा अशी सूचना आपण केली होती. मात्र निकष ठरविले गेले. विश्ोषमध्ये त्यात सातत्याने बदल केले गेले. त्यामुळे शेतकºयांना त्रास झाला. शासनाला योजना सुरू करताना पुरेपुर अंदाज आला नाही, असे सांगत राज्य सरकारला घरचा आहेर दिला. मात्र तरीही ९७ हजार लोकांना ४८८ कोटी १५ लाखांची कर्जमाफी झाली. ८० हजार लोकांना २५ हजार प्रोत्साहन भत्त्यापोटी १३८ कोटी मिळाले. तर ओटीएसचा ९ हजार ६६७ शेतकºयांना १११ कोटींचा लाभ मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या २ लाख २५ हजार सभासदांपैकी १ लाख ८७ हजार ९८६ सभासदांना लाभ मिळाला आहे. राहिलेल्या ३८ हजार शेतकºयांनाही लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करू असे जाहीर करीत ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. काही सभासदांनी विरोध दशर््विल्यावर विरोध नोंदवून घेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.पैसे भरले त्यांचा काय गुन्हा? खडसेंचा शासनाला सवालयावेळी काही सदस्यांनी ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्यासाठी जिल्हा बँकेने ठराव करून पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. त्यास खडसे यांनी दुजोरा देत सांगितले की, ज्यांनी पैसे भरले नाहीत, त्यांना शासनाने कर्जमाफी दिली. आणि ज्यांनी प्रामाणिकपणे पैसे भरून कर्जफेड केली, त्यांनी काय चूक केली? पैसे भरले त्यांचा काय गुन्हा? असा सवाल शासनाला केल्याचे तसेच त्यांचा वेगळ्या मार्गाने विचार करावा, अशी मागणी केल्याचे सांगितले. शासनही त्याबाबत विचार करीत असून आपण त्यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले.संचालकांच्या अनुपस्थितीबाबत नाराजीकाही सदस्यांनी व्यासपीठावर ५० टक्के संचालक अनुपस्थित असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांना या सभेचे महत्व नाही का? असा सवाल केला. अजेंड्यावरील विषय मंजूर करतानाही सभासदांच्या रजेचा विषय येताच पुन्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.विकासोंच्या वसुलीबाबतही सदस्यांनी विचारला जाबगत आर्थिक वर्षात कर्जाची १०० टक्के वसुली करणाºया जिल्'ातील १६ विकासोंच्या चेअरमन व सचिवांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पाळधी बु.।। विकासोचे गेल्या ४४ वर्षांपासून चेअरमन असलेले गोकुळसिंग प्रल्हाद पाटील (७६) यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यावर काही सदस्यांनी जेथे ५०० सोसायट्या १०० टक्के कर्जवसुली करीत होत्या. त्यांची संख्या १६वर कशी आली? असा जाब विचारला. त्यावर याला शासन जबाबदार असल्याचे सांगण्यात आले.