शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास नागरिकाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:22 IST

आरोपीला अटक होईपर्यंत काम बंद

जळगाव : उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक प्रफुल्ल पाटील यांना राजा भगवान सोनवणे या व्यक्तीने बुधवार, २८ रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कार्यालयातच काहीही कारण नसताना शिविगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसांत दिली आहे. दरम्यान आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नगरभूमापन, तालुका भूमिअभिलेख व जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाºयांनी गुरूवारी कामबंद आंदोलन केले. अपर जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा जिल्हा भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे.गुरूवार २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात राष्टÑीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत मिळकत पत्रिकांचे डाटा रिस्ट्रक्चरिंगचे काम व कार्यालयीन कामकाजात कर्मचारी व्यस्त असताना राजा सोनवणे हे तेथे आले. त्यांनी भू-करमापक कृष्णा भट यांना एकेरी भाषेत इतका वेळ कार्यालयात का थांबतो? असे सांगत वाद घातला. त्यावेळी भू-मापक प्रफुल्ल पाटील हे भट यांच्याशी कामाबद्दल काही बोलत असताना सोनवणे याने प्रफुल्ल पाटील यांना अश्लील शिविगाळ करून चापटा व बुक्क्याने मारहाण केली. तसेच खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत निघून गेला.निवेदनात व फिर्यादीत म्हटले आहे की, सोनवणे याने यापूर्वीही तत्कालीन तहसीलदार कैलास देवरे यांच्याशी हुज्जत घातली होती. तहसील व पुरवठा विभागातील कर्मचाºयांश्ी वाद घालून नेहमीच शिविगाळ करतो. हप्ता वसुलीसाठी हा उद्योग असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे.त्रास नेहमीचाचयाबाबत अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील भूमि अभिलेख कार्यालयात जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख धोंगडे, नगर भूमापन अधिकारी कार्यालय प्रमुख राजेंद्र कपोते, अतिरिक्त प्र.उपअधीक्षक भूमि अभिलेख यांच्याशी राजा सोनवणे हे कोणतेही कार्यालयीन काम प्रलंबित नसताना नेहमीच कार्यालयात येऊन हुज्जत घालून भ्रष्टाचाराचे आरोप करतात. तुम्ही पैसे खाऊन काम करतात. तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, असे सांगत धमकावतात. तसेच कारण नसताना कार्यालयात येऊन कर्मचाºयांच्या खुर्चीवर बसून काहीही वाईट भाषेत बोलतात. महिला कर्मचारी यांनाही लज्जास्पद शब्द वापरतात. अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देत असतात.सायंकाळपर्यंत अटक नाहीचया घटनेनंतर गुरूवारी भूमि अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचाºयांनी व अधिकाºयांसह जाऊन अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांना तसेच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना निवेदन देत आरोपीला अटक होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा दिला. मात्र सायंकाळपर्यंतही आरोपीस अटक झालेली नव्हती. त्यामुळे अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याची भूमिका जिल्हा भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेकडून जाहीर करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव