शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बहुजन क्रांतीच्या मोर्चाने शहर दणाणले

By admin | Updated: April 13, 2017 00:30 IST

एकच पर्व, बहुजन सर्व : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी

भुसावळ : शहर आणि तालुक्यातील  विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन बुधवारी काढलेल्या ‘बहुजन क्रांती मोर्चाने भुसावळ शहर चांगलेच दणाणले. मोर्चाचे प्रदेश सदस्य अनिल माने यांनी शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी  देण्याची मागणी करून त्यासाठी बहुजनांचा लढा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला.मोर्चाच्या आधी शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणावर मागण्यासंदर्भात सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी बहुजन क्रांती मोर्चाचे प्रदेश सदस्य डॉ अनिल माने होते.  ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून एस.पी.भिरुड, संजय भटकर, अनिस अहमद यांनी ओबीसींचे प्रश्न, मंडल आयोग यावर विचार व्यक्त करून प्रबोधन केले. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी यासाठी बहुजनांचा लढा सुरूच राहील, शिवाय  निवडणुकांमध्ये यापुढे बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केले. महिला प्रतिनिधी म्हणून प्रतिभा कोळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.सभेनंतर मोर्चा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाच्या वतीने शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकर चिंचकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.   प्रास्ताविक आर. पीतायेडे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केले.(प्रतिनिधी)ईव्हीएम हटवून निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर करावा. शेतकºयांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी व त्यांच्या शेतीमालास हमीभाव देण्यात यावा, समान नागरी कायदा करण्यात येऊ नये. मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावे. भुसावळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा  विकास करावा. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनजवळ शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. वेल्हाळे येथील तलाव भिल बांधवांना मच्छीमारी करण्यासाठी खुला करण्यात यावा. बोदवड येथील बेपत्ता तरुण रवींद्र ठाकरे यांचा शोध लावावा.दोषींना कडक शासन करण्यात यावे. आदिवासी गावांमध्ये घरकूल, पाणी, वीज, रस्ते व रोजगार द्यावा. मन्यारखेडा नागरिकांना रेशन कार्ड देण्यात यावे, कंडारी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, कपिलनगर निंभोरे बु.।। येथे पाण्याची टाकी, स्वतंत्र मतदान केंद्र, सार्वजनिक शौचालय व ग्रामपंचायत कार्यालय तयार करावे. तपत कठोरा येथे १० वीपर्यंत शाळा, सार्वजनिक शौचालय, घरकूल, व्यायामशाळा व गावठाण जागा द्यावी.    मुद्रा लोन व घरकूल त्वरित मिळावे व बँकेतील एजंटांची तुरुंगात रवानगी करण्यात यावी.  ग्रामपंचायतींना डॉ.आंबेडकर जयंतीसाठी जास्त निधी देण्यात यावा, मोंढाळे गावातील लाभार्थीची चौकशी करून रेशन कार्ड देण्यात यावे. आदिवासी भिल व पारधी यांना शबरी घरकूल योजनेचा लाभ द्यावा. अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा. भूमिहीन आदिवासींना शासकीय वनजमिनी वाटप कराव्यात यावे. आदिवासी समाज यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या जाचक अटी रद्द कराव्या.  यांचा मोलाचा सहभाग ओबीसी समाज एस.पी.भिरुड, एस.सी.चर्मकार समाज एस.के.भटकर,  लेवा पाटीदार एस.एस. जंगले, ओबीसी  मुरलीधर आंबोडकर, एस.सी.बौद्ध, बामसेफ रमेश तायडे, मूलनिवासी कुंभार समाज गिरधर भारते,  भकन लोखंडे,   भिक्खू संघ भदन्त सुमनतिस्स, देवीदास हिवरे, बी. ए.सपकाळे, प्रशांत तायडे, अ‍ॅड. एम.एस. सपकाळे,मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड अनिस अहमद यांच्या सह्या आहेत.शिस्तबद्ध मोर्चा बहुजन क्रांती मोर्चातर्फे काढण्यात आलेला मोर्चा अतिशय शांततेत निघाला. भरदुपारी कडक उन्हात मोर्चेकरी महिला, पुरुष दोन दोनच्या रांगेने  उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर पोहचले.गेल्यावर उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकर चिंचकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.