शेंदुर्णी, ता.जामनेर : येथील विविध केंद्र सरकारच्या कार्यालयांच्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांची कामे लांबणीवर पडत आहेत.येथे बीएसएनएलची इंटरनेट सेवा केव्हा ठप्प होईल सांगता येत नाही. त्यामुळे बँका, डाक कार्यालय, शिक्षणसंस्था, सेतू सुविधा आदी ठिकाणी इंटरनेट नसल्याने अनेक कार्यालयीन कामे वेळेवर होत नाहीत. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये देखील इंटरनेट लिंक अचानक बंद पडते. परिसरातील १४ खेड्यांची सहकार व आर्थिक क्षेत्रातील लाखोंची उलाढाल दैनंदिन व्यवहारातून होत असते. त्यामुळे यात सुधारणा होणे गरजेचे आहे. शेतक-यांना पीक विमा, कर्जासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन फॉर्म भरणे आदी कामांमध्ये यामुळे अडथळा निर्माण होत आहे.
शेंदुर्णीत इंटरनेट सुविधेअभावी नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:48 IST