शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे नागरिकांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:01 IST

चाळीसगाव , जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला असून देशासह राज्यभर संचारबंदी लागू असून यामध्ये सर्व एसटी, ...

ठळक मुद्देसंचारबंदीचा फटकावाहनाअभावी गावाकडे येणे झाले अवघड

चाळीसगाव, जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला असून देशासह राज्यभर संचारबंदी लागू असून यामध्ये सर्व एसटी, रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद झालेली आहे. त्याची झळ अनेक नागरिकांना सोसावी लागत आहे त्यात सर्व सामान्यांना पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने खासगी गाड्यासुद्धा बंद झालेल्या आहेत. याचा फटका रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे तर एसटी व रेल्वे सध्या बंद असल्याने नागरिकांना गावाकडे येणेसुद्धा अवघड झाले आहे.गावाकडे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना पायपीट करीत चालत यावे लागत आहे. कोरोना सदृश रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने खबरदारी घेतली. मात्र याच्या भीतीने मुंबई व पुण्यातील कामाधंद्याच्या शोधात गेलेले अनेकजण खेड्याकडे वळालेले असतांना त्यांना पायपीट हाच शेवटचा पर्याय उरला आहे.पनवेल येथे टाटा पॉवर केबल लाईनचे काम करणाऱ्या हातमजुरांवर ही वेळ येवून ठेपली आहे. २६ रोजी पनवेल येथून पायपीट करीत निघालेले मजूर अमरावती जिल्ह्यातील लोणी तालुक्यातील बहिलनपूर या गावी निघाले आहेत. जिगर भोसले, सुधाकर भोसले, मुनेष पवार यांच्यासह दोन चिमुरड्यांसह निघालेले मजूर कुटुंब आज चाळीसगावला मध्यरात्री पोहोचले.सदर मजूर कुटुंब हे मध्यरात्री चाळीसगाव शहरात आले असतांना समाजसेवक स्वप्नील कोतकर, अभिजीत शितोळे, स्वप्नील धामणे, अभिलाष एसके, हर्षल ब्राह्मणकर या समाजसेवकांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करीत तत्काळ त्यांना जेवणाची व्यवस्था करुन देत त्यांना वेदनाशामक औषधींची उपलब्धता करुन दिली. तर त्यावेळी रस्त्यावरुन जात असलेले सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव, लंकेश शर्मा, गव्हर्नमेंट कॉंट्रॅक्टर रवी देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी रोख स्वरुपात मदत करीत समाजभान जपत मजूर कुटुंबास मायेचा आधार देत समाजभान जोपासले.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकChalisgaonचाळीसगाव