शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

तलाठी बांधवांच्या लेखणी बंदमुळे नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:14 IST

उतारे मिळत नसल्याने कामे खोळंबली

ठळक मुद्देदोन दिवसात राज्यभर बंदचा इशाराउतारे मिळेना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्हाभरात कोणतेच उतारे मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. दरम्यान, दोषींना अटक न केल्यास राज्यभर लेखणी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी 18 जानेवारीपासून  लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून ते 12 दिवसानंतरही सुरूच आहे. आता या आंदोलनात नाशिक विभागातील तलाठीदेखील सहभागी झाले असून 24 जानेवारीपासून संपूर्ण विभागात लेखणी बंद सुरू आहे. 12 दिवस उलटूनही जिल्हा प्रशासन व शासनाने कोणतीही दखल न घेण्यात आलेली नाही.

कामकाज ठप्पतलाठी बांधवांच्या लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्हाभरात कामकाज ठप्प झाले आहे. महसूल विभागाचा महत्त्वाचा दुवा असलेल्या तलाठी बांधवांमार्फत काम होत नसल्याने नागरिकांचे कामे खोळंबून विभागाचा महसूलही बुडून नुकसान होत आहे. उतारे मिळेनालेखणी बंदमुळे तलाठी कार्यालयेच बंद राहत आहे. दररोज अनेक जण या ठिकाणी कामानिमित्त येऊन माघारी परतत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना सातबारा उता:यासह विविध प्रकारचे नमुने, मालमत्तेवरील बोजांचे कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडले आहे. या शिवाय शालेय विद्याथ्र्यासह नागरिकांना तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्यासाठी लागणारे दाखलेही मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. दोषींना अटक न केल्यास राज्यभरात लेखणी बंद आंदोलनदोषींना अटक होत नसल्याने जिल्हा बंद नंतर विभागातही लेखणी बंद आंदोलन सुरू झाले आहे. या संदर्भात 29 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर, सरचिटणीस जी.डी. बंगाळे यांच्यासह  राज्य संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डूबल, सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे व मारहाण झालेले तलाठी योगेश पाटील तसेच इतरांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी केली. या वेळी विभागीय आयुक्तांनी आंदोलन मागे घेण्याविषयी पदाधिका:यांना सांगितले. मात्र आंदोलनावर ठाम राहणार असून दोषींना अटक न झाल्यास दोन दिवसात राज्यभर लेखणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे पदाधिका:यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तलाठी बांधव हे सरकारचेच काम करीत असतात. मात्र सध्या सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या पदाधिका:यांकडूनच मारहाण होत असेल तर आम्ही कोणाकडे पहायचे, असा सवाल जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर यांनी केला आहे. या प्रकरणात केवळ चालक, मालकांना अटक केली आहे, मात्र पोलिसांकडे आम्ही दिलेल्या फिर्यादीमध्ये ज्यांची नावे आहे, त्या सर्वाना अटक करावी अशी मागणी असल्याचेही ठाकूर म्हणाले. पोलिसांकडूनही या प्रकरणात चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.  तलाठी मारहाण प्रकरणात दोषींना अटक होत नाही तोर्पयच लेखणी बंद सुरूच राहणार आहे. मारहाणीचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने वेळीच ते रोखणे गरजेचे आहे. - डी.एस. भालेराव, संघटक, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ.