शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहरे लॉक, तरीही लॉकडाऊनमध्ये काय सुरू आहे गुन्हेगारी जगतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 13:16 IST

दिवसाढवळ्या शेतात मद्यपार्टी, तरीही पोलीस गाफिल

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनान जळगाव, भुसावळ व अमळनेर ही तीन शहरे कडक लॉक केले आहेत. या तीन शहरांमध्ये प्रत्येक रस्ता, प्रभागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, असे असतानाही जळगाव व भुसावळ शहरात गुन्हे मात्र ओपन असल्याचे दिसून आले. शिवाजी नगरातील भुरे मामलेदार धनाजी काळे नगराच्या समोर शेतात दिवसाढवळ्या मद्य पार्टी झाली, त्यानंतर तेथेच गोळीबार झाला. या घटनेच्या आदल्या दिवशी भुसावळ शहरात आंंबेडकर नगरात एका तरुणावर गोळीबार झाला. या घटना घडत असताना शहरे खरच लॉक आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.शिवाजी नगरात गोळीबार प्रकरणी पोलिसांनी माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलासह चौघांना पकडले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल पकडण्यात आले. हे चारही तरुण शेतात रोज मद्यपार्टी करतात असे रहिवाशांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन असताना त्यांना मद्य कुठून मिळाले, दिवसाढवळ्या पार्टी होत असताना हा प्रकार पोलिसांना दिसू नये हे आश्चर्य आहे. कारण या रस्त्यावर पोलीस व जनतेचा सारखा वावर असतो. भुसावळ शहरातदेखील गुरुवारी रात्री आंबेडकर नगरात आदीत्य संजय लोखंडे (१९) या तरुणावर गोळीबार झाला. हे शहरदेखील लॉक करण्यात आले आहे. लॉक असलेल्या शहरातच पिस्तुल बाहेर निघायला लागलेत. याचा अर्थ येथील गुन्हेगारांना लॉकडाऊनचे गांभीर्य नाही आणि यंत्रणेचा त्यांच्यावर वचक नाही.गेल्या दोन दिवसात शहरात गोलाणी मार्केटमध्ये अल्पवयीन मुलीवर भरदिवसा बलात्कार झाला तर त्याच्या आदल्या दिवशी शिरसोली रस्त्यावर कन्नड येथून भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनाला दुचाकी आडव्या लावून चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आले. हे दोन्ही गुन्हे उघडकीस आले असले तरी लॉकडाऊनमध्येच गुन्हे ओपन होत असल्याचे दिसून येत आहे.भुसावळात पकडले दोन पिस्तुलभुसावळ शहरातील आंबेडकर नगरात गोळीबार झाल्यानंतर दोन दिवसांनी अर्थात शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टिंबर मार्केटमध्ये एका तरुणाजवळून दोन पिस्तुल पकडले. आकाश गणेश राजपूत (२१, नारायण नगर, भुसावळ) याला अटक केली. त्याच्याजवळून ६० हजार रुपये किमतीचे दोन पिस्तुल जप्त करण्यात आले. शरीफोद्दीन काझी, युनुस शेख, रणजीत जाधव व अरुण राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली. ही कारवाईदेखील लॉकडाऊनमध्येच व लॉक असलेल्या भुसावळ शहरातच झाली.

टॅग्स :Jalgaonजळगाव