शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:51 IST

टमाट्याचे भाव गडगडले

जळगाव : उन्हाळ््यामुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. यात कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांचे भाव तर जवळपास दुपटीने वाढले असून इतर भाज्याही ‘भाव’ खात आहेत. दुसरीकडे भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव गडगडले आहे.गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढत आहे. या आठवड्यात तर कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांच्या भावात जवळपास दुपटीने तेजी आली आहे.यामध्ये दैनंदिन वापरात येणारी कोथिंबीर सर्वाधिक महागली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटलने खरेदी झालेली कोथिंबीर या आठवड्यात थेट ४००० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. किरकोळ बाजारात तर कोथिंबीरने प्रती किलोसाठी शंभरी पार केली आहे. कोथिंबीरच्या दर्जानुसार किरकोळ बाजारात हे भाव असून ८० ते १२० रुपये प्रती किलोने ती विक्री होत आहे.कोथिंबीर खालोखाल वांग्याचे भाव वाढले असून गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याचे भाव या आठवड्यात ८०० ते २२०० रुपये रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. किरकोळ बाजारात ते दर्जानुसार ३० ते ७० रुपये किलोने विक्री होत आहे.घरासह हॉटेल, नाश्त्याचे दुकान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरात येणारी हिरवी मिरचीदेखील अधिक ‘तेज’ झाली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल असणारी हिरव्या मिरचीचे भाव या आठवड्यात २००० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारतही मध्यम दर्जाची मिरची ८० ते १०० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.टमाट्याचे भाव निम्म्यावरएरव्ही हिवाळ््यामध्ये टमाट्याची आवक वाढून त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होतात. मात्र यंदा भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १००० ते १७५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टमाट्याचे भाव या आठवड्यात ५०० ते १००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. किरकोळ बाजारात टमाटे १५ ते २० रुपये किलोने विक्री होतआहेत.सध्याकॉलन्यांमध्येहीटमाटेविक्रीच्याहातगाड्यादिसतआहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव