शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

चोसाका सहयोगी तत्त्वावर सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 22:53 IST

चोपडा : चहार्डी येथील साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी, कामगारांसह अनेक देणी थकीत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी कारखाना ...

चोपडा : चहार्डी येथील साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी, कामगारांसह अनेक देणी थकीत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी कारखाना सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. यातून येणाऱ्या रकमेच्या विगतवारीबाबत शेतकरी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.प्रारंभी चोसाकाचे संस्थापक चेअरमन स्व.धोंडूआप्पा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन शेतकरी कृती समितीचे एस.बी.पाटील, भागवत पाटील, तुकाराम पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी केले.कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी सृष्टी शुगर लि.पुणे या कंपनीला सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा झाली असून त्यात प्रथम पाच कोटी रुपये देणाºया कंपनीशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मिटकॉन आणि साखर आयुक्तांकडे प्रस्ताव दिला असून त्यांच्या आदेशाने पुढील कार्यवाही होईल. कारखान्यावर ९६ कोटी कर्ज असल्याने त्याची मर्यादा भाडेतत्त्वावर देण्याच्या नियमाच्या कक्षेत येत नसल्यामुळे कारखाना सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, असे चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांनी विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांसमोर सांगितले.यावेळी माजी आमदार दिलिप सोनवणे, व्हा.चेअरमन शशीकांत देवरे, जि.प.अध्यक्ष गोरख पाटील, संचालक प्रवीण गुजराथी, डॉ.महेंद्र पाटील, संभाजी पाटील, भरत पाटील, अनिल पाटील, निलेश पाटील, सुनिल महाजन, चंद्रशेखर पाटील, अनिल पाटील, आनंदराव रायसिंग, प्रमोद पाटील, बाळासाहेब पाटील, गोपाळ पाटील, सदाशिव पाटील, अकबर पिंजारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव आधार पाटील यांनी केले.