शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चोरवडच्या श्रमदानाला दातृत्वाचा पाझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 21:17 IST

सुरतेतील छोटूभाई पाटील यांची ‘गाव’प्रेमातून पाणी फाऊंडेशनला आर्थिक मदत

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनला ५१ हजारांची आर्थिक मदतपाटील दाम्पत्याने केले दोन तास श्रमदान‘श्रमदानातून मेहनत आणि मेहनतीतून सिंचन’ या उपक्रमासाठी एकवटले चोरवड गाव

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२८ : सुरतेत सामाजिक कार्याचा गाडा हाकत असताना गावकीच्या प्रेमाने चिंब भिजलेल्या छोटूभाई पाटील यांनी चोरवड ता.पारोळा या त्यांच्या मूळगावी दोन तास श्रमदान केले. याउपर त्यांनी पाणी फाऊंडेशनला ५१ हजारांची आर्थिक मदत देत सिंचन उपक्रमांना बळ दिले.कागदावरच ओलिताखाली असलेल्या चोरवड शिवारात सिंचन प्रकल्पांचा नितांत गरज आहे. त्यासाठी सुरत भाजपाचे उपाध्यक्ष छोटूभाई पाटील आणि त्यांच्या पत्नी व सुरत येथील नगरसेविका रोहिणी पाटील यांनी ‘गाव’प्रेमातून पुढाकार घेत गेल्या महिन्यात महाराष्टÑाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. शासन दरबारी पाठपुरावा सुरु असताना दि.२८ रोजी पाटील दाम्पत्याने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून चोरवड गावात सुरु असलेल्या श्रमदानात सहभाग घेतला.चोरवड ग्रामस्थांच्यावतीने जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पाटील दाम्पत्याने दोन तास श्रमदान केले.त्यानंतर छोटूभाई पाटील यांनी श्रमदान कार्यासाठी ५१ हजारांची मदत केली.तसेच श्रमदानासाठी लागणाऱ्या साहित्यही त्यांनी उपलब्ध करुन दिले. ‘श्रमदानातून मेहनत आणि मेहनतीतून सिंचन’ या उपक्रमासाठी चोरवड गाव एकवटले आहे. परप्रांतात समाजकार्याचा गाडा हाकत असतानाही गावकीच्या नात्यातून पाटील दाम्पत्याने श्रमदानात घेतलेला सहभागाविषयी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :ParolaपारोळाJalgaonजळगाव