कुंदन पाटील/ आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.४ : चोरवड ता.पारोळा येथील बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुुनिक निवारा उभारण्यात आला आहे. सुरत भाजपाचे अध्यक्ष छोटूभाई पाटील आणि नगरसेविका रोहिणी पाटील या दाम्पत्याने दत्त जयंतीच्यादिवशी दातृत्वाची जत्रा भरवत गावगाड्याला सावलीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.पाटील दाम्पत्याचे मूळ गाव चोरवड. गावप्रेमापोटी याआधीही या दाम्पत्याने गावातील शाळेला अत्याधुनिकतेचे बुस्टर दिले. त्यापाठोपाठ वृद्धांसाठी सुविधायुक्त बैठकी यंत्रणा उपलब्ध केली. चोरवड बसस्थानकावर ताटकळत उभ्या राहणाºया गावकºयांची समस्या हेरत या दाम्पत्याने चोरवड बसस्थानकावर अत्याधुनिक प्रवासी निवाºयाचे शेड उभारले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेड उभारण्यात आली आहे. सुरतेचे खासदार सी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात एकमेव चोरवडमध्ये अत्याधुनिका प्रवासी शेड उभारले गेले आहे. दत्तजयंतीनिमित्त या निवाºयाचे उद्घाटन छोटूभाई पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांच्यासह चोरवड ग्रा.पं.सदस्य, वि.का.सोसायटीचे सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चोरवडला भरली दातृत्वाची जत्रा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 19:37 IST
छोटूभार्इंची ‘मदत’गिरी : बसस्थानकावर अत्याधुनिक प्रवासी निवारा
चोरवडला भरली दातृत्वाची जत्रा!
ठळक मुद्देशाळेसाठी दिली होती अत्याधुनिक साहित्यवृद्धांच्या बैठकीसाठी सुविधायुक्त यंत्रणेची उभारणीदत्तजयंतीच्या दिवशी झाले प्रवासी निवाºयाचे उद्घाटन