शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात जळगाव एसटी विभागातील चोपडा बसस्थानक राज्यात दुसरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 00:46 IST

या अभियानातील तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात २५० आगारातील अ वर्गातील १४७ बसस्थानकांमध्ये कराड बसस्थानकाचा प्रथम क्रमांक, तर जळगाव विभागातील चोपडा बसस्थानकाने दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या स्थानावरील काटोल व संगमनेर बसस्थानकांनी समान गुण मिळविले आहेत.

भूषण श्रीखंडे -

जळगाव : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा व बसस्थानकात स्वच्छ आणि सुंदर वातावरणात राहावे, यासाठी राज्य शासनाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत राज्यातील सर्व एसटी महामंडळाच्या बसस्थानकात राज्यस्तरीय समितीकडून सर्वेक्षण केले. या अभियानातील तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात २५० आगारातील अ वर्गातील १४७ बसस्थानकांमध्ये कराड बसस्थानकाचा प्रथम क्रमांक, तर जळगाव विभागातील चोपडा बसस्थानकाने दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या स्थानावरील काटोल व संगमनेर बसस्थानकांनी समान गुण मिळविले आहेत.

एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचीही वाहतूक सेवा स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले होते. राज्यातील ‘अ’ वर्गातील बसस्थानकांमध्ये पुणे प्रादेशिक विभाग व सातारा एसटी विभागातील कराड बसस्थानकाने ८१ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नाशिक प्रादेशिक विभागातील जळगाव एसटी विभागातील चोपडा बसस्थानकाने ७९ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. नागपूर विभागातून काटोल व अहमदनगर एसटी विभागातील संगमनेर या बसस्थानकांनी ७५ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे.

नाशिक प्रादेशिक, जळगाव विभागात चोपडा नंबर वनअ, ब, क नुसार वर्गवारी करून बसस्थानकांचे तीन टप्प्यात सर्वेक्षण केले होते. नाशिक प्रादेशिक विभागात चोपडा एकनंबर असून, दोन नंबरवर संगमनेर, तर धुळे विभागातील दोंडाईचा ७४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच जळगाव एसटी विभागात ‘अ’ वर्गवारी बसस्थानकात चोपडा प्रथम, ६१ गुण मिळवीत चाळीसगाव दुसरे, तर जामनेर बसस्थानकाने ६० गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव