शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा मंडळ अधिकाऱ्यासोबतच पंटर एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:29 IST

वाळू वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये लाचेची मागणी करणाºया चोपडा येथील मंडळ अधिकाºयास लाचलुचपत पथकाने शुक्रवारी मध्यरात्री पंटरासह अटक केली.

ठळक मुद्देवाळू वाहतुकीसाठी ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आठ हजारांची मागितली लाचतीन दिवसांनंतर महसूल कार्यालयातील दुसरी घटना

चोपडा, जि.जळगाव : वाळू वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये लाचेची मागणी करणाºया चोपडा येथील मंडळ अधिकाºयास जळगाव लाचलुचपत पथकाने शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास खाजगी पंटरासह अटक केल्याने चोपड्यासह जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. मंडळाधिकारी राजेंद्र आधार वाडे. (वय ५०, रा.आंबेडकर नगर, चोपडा) व खाजगी पंटर समाधान रमेश मराठे (वय २४, रा.पाटील गढी, चोपडा) अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत.विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच शेतीच्या मृत्यूपत्रावरून नाव लावण्याच्या कारणावरून १५ हजार रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदार जितेंद्र पंजे यांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर तिसºया दिवशी मंडळ अधिकारी लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.चोपडा तालुक्यातील २५ वर्षीय तक्रारदाराचे ट्रॅक्टर वाळू वाहतुकीदरम्यान कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा आठ हजार रुपयांची मागणी मंडळाधिकारी राजेंद्र वाडे यांनी केली होती. याबाबत जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविल्यानंतर सापळा रचण्यात आला. विशेष म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मंडळाधिकारी वाडे यांना लाच स्वीकारताना पथकाने ताब्यात घेतले.या पथकाने केली कारवाईपोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी व संजय बच्छाव रवींद्र माळी, हवालदार अशोक आहिरे, हवालदार सुरेश पाटील, सुनील पाटील, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने कारवाई केली. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागChopdaचोपडा