राष्ट्रभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत चोपडा कनिष्ठ महाविद्यालय प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 05:08 PM2018-08-17T17:08:23+5:302018-08-17T17:08:31+5:30

Chopda junior college first in patriotic group song competition | राष्ट्रभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत चोपडा कनिष्ठ महाविद्यालय प्रथम

राष्ट्रभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत चोपडा कनिष्ठ महाविद्यालय प्रथम

Next


चोपडा, जि.जळगाव : रोटरी क्लब व इनरव्हील क्लबतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात कनिष्ठ महाविद्यालयीन गटात महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
सहभागी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक किशोर खंडाळे व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश जी पाटील, अध्यक्ष अ‍ॅड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशा विजय पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.एम.बी हांडे, प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, डॉ.के.एन. सोनवणे, प्रा.बी.एस. हळपे, पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय.पाटील, रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Chopda junior college first in patriotic group song competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.