शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावच्या ‘डोगरी-तितूर' संगमाला पर्यटनाचा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:17 IST

पाच कोटीचा निधी मंजुर: मस्तानी अम्मा टेकडीचेही सुशोभिकरण

ठळक मुद्देपर्यटनाचे कोंदण धार्मिकतेचा साजनदीघाट, वानोद्यान

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. १० - पिर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांचा दर्गाह आणि याच परिसरात पाटणादेवीच्या धवलतीर्थार्तून उगम पावलेली डोंगरी नदी तर पश्चिमेकडून येणारी तितूर यांचा शहरात दत्तवाडी नजीक संगम होतो. याचं संगमाला आणि नजीकच्या मस्तानी अम्मा टेकडी परिसराला पर्यटनाचा साज मिळणार असून आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.चाळीसगाव शहराला ऐतिहासिक पदर आहेत. धार्मिक एकात्मतेचे देखील येथे बामोशी बाबांच्या ऊरुस - यात्रेत दर्शन होते. जवळच असलेल्या गौताळा अभयारण्य आणि पाटणादेवी परिसरात वर्षभर पर्यटक, भाविक आणि अभ्यासकांचा राबता असतो. शहरातही दत्तवाडी परिसरात डोंगरी आणि तितूर या दोन नद्यांचा संगम झाला आहे. याला लागूनच मुस्लिम बांधवांचा मस्तानी अम्मा दर्गाह असून येथेही धार्मिक एकोपा दिसून येतो. संगम आणि दर्गाह परिसराचे धार्मिक पावित्र्य जोपासण्यासह परिसराला पर्यटनाचे रुपडे देण्यात येणार आहे. शहर सौदर्यांसाठी देखील ही मोठी उपलब्धी असणार आहे.नदीघाट, वानोद्यानडोंगरी - तितूर संगम स्थळावर नदीला घाट बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यातील डोंगरी नदी पाटणादेवीच्या धवलतीथार्तून उगम पावत असल्याने संगमावर हिंदू बांधव धार्मिक विधीही करतात. संरक्षक भिंत, वनोद्यान, मुलभूत सुविधा, मस्तानी अम्मा टेकडी परिसराचे सुशोभिकरण होईल. यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने ४ कोटी ९२ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.पर्यटनाचे कोंदण धार्मिकतेचा साजगेल्या वर्षी डोंगरी - तितूर नदी पात्राची स्वच्छता केली गेली. चाळीसगावची लाईफ लाईन अशी ओळख असणा-या या नद्यांनी मोकळा श्वास घेतला. संगम परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा. ही मागणी याव्दारेच पुढे आली. याचा पाठपुरावा करुन आमदार पाटील हे पाच कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणण्यात यशस्वी ठरले आहेत.घाणीसह सततच्या दूर्लक्षामुळे संगम परिसर शापच ठरला होता. मात्र गेल्या वर्षी नदीपात्राची स्वच्छता करुन पालिकेने पुढचे पाऊल टाकले. पर्यावरणप्रेमी आणि हिंदू - मुस्लीम बांधवांच्या मागणी नुसार परिसर विकासाचा कृती आराखडा पर्यटन विभागाला सादर केला. निधी प्राप्त झाला असून यामुळे चाळीसगाव शहराचे सौंदर्य आणखी उजळणार आहे.- उन्मेष पाटील, आमदार चाळीसगाव

टॅग्स :Chalisgaonचाळीसगावtourismपर्यटन