शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर करणार चित्ररथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 21:37 IST

जिल्हाधिकार्‍यांच्याहस्ते हिरवी झेंडी : गावगावी पथनाट्य

जळगाव : जागतिक हात धुवा दिवसानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हावासियांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी याकरीता तयार करण्यात आलेल्या ह्यजागर स्वच्छतेचाह्ण चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकरी राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे आदी उपस्थित होते.जागतिक हात धुवा अभियानानिमित्ताने युनिसेफ व जिल्हा प्रशासन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हात धुणे, स्वच्छता बाळगणे व कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत स्वच्छता रथाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याकरीता १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत हा चित्ररथ जिल्हाभर जनजागृतीसाठी फिरविण्यात येणार आहे. चित्ररथाद्वारे तसेच विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी यांच्यावतीने पथनाट्य सादर करुन स्वच्छता राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येणार आहे.स्वच्छता जागर चित्ररथ १९ ऑक्टोबर रोजी शिरसोली, एरंडोल, पिंपळकोठा, धरणगाव, पाळधी बु. याठिकाणी जाऊन जनजागृती करेल. २० ऑक्टोबर रोजी चोपडा, अडावद, अमळनेर, डांगर बु. पारोळा, राजवड येथे, २१ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव, पातोंडा, कजगाव, भडगाव, पाचोरा, नगरदेवळा येथे, २२ ऑक्टोबर रोजी जामनेर, नेरी, बोदवड, नाडगाव, मुक्ताईनगर, कोथळी येथे तर २३ ऑक्टोबर रोजी रावेर, मोरगाव, यावल, भालोद, भुसावळ, फुलगाव येथे रथाचा समारोप होईल. चित्ररथाचे आपल्या गावात आगमन झाल्यावर नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करुन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व स्वच्छतेचे महत्व जाणून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव