शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कुलरच्या शॉकने बालकाचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 12:40 IST

खंडेराव नगरातील घटना

जळगाव: कुलरचा शॉक लागल्याने सहा वर्षीय आरव सुनील भोई (रा़ खंडेरावनगर) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ शॉक लागल्याने दगावल्याची तीन दिवसातील ही तिसरी घटना आहे.इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत असलेला आरव हा शुक्रवारी सकाळी घरात खेळत होता़ खेळता-खेळता पत्र्याच्या कुलरला त्याचा स्पर्श झाला़ अन् क्षणात कुलरमध्ये उतरलेल्या विजेचा त्याला जोरदार धक्का बसला आणि तो खाली कोसळला़ हा प्रकार कुटुंबीयांनी त्याला त्वरित जिल्हा रूग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे खंडेरावनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ आरव याच्या पश्चात आजी-आजोबा आई-वडील, मोठा भाऊ, असा परिवार आहे़ बुधवारी पिंप्राळा हुडको भागात गुरु संतोष माळी (३) आणि गुरुवारी ओम शेखर सोनवणे (१२, रा. मेहरुण) या बालकाचा वीज खांबाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव