शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणाने बालकांच्या आजारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 15:53 IST

बदलत्या वातावरणामुळे व वाढत्या थंडीने लहान मुलांच्या आजारात लक्षणीय वाढ झाली असून, खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजामनेर उपजिल्हा रुग्णालयात वाढीव बेडची गरजरुग्णांची संख्या वाढल्याने एका बेडवर दोन रुग्ण

जामनेर, जि.जळगाव : बदलत्या वातावरणामुळे व वाढत्या थंडीने लहान मुलांच्या आजारात लक्षणीय वाढ झाली असून, खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने उपजिल्हा रुग्णालयात येत असून उपलब्ध बेड अपूर्ण पडत आहे. गेल्या वर्षी जामनेर व पहूर रुग्णालयासाठी वाढीव ५० खाटांची मंजुरी मिळाली होती, मात्र ती कागदावरच राहिली. जामनेरला रुग्णांची संख्या वाढल्याने एका बेडवर दोन रुग्णांना ठेवण्यात येत आहे.सध्या थंडीत अचानक वाढ झाल्याने लहान मुलांना सर्दी, खोकला आदी रोगाची लागण वाढली आहे. खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेणाº्या लहान मुलांची संख्या या आठवड्यात वाढली आहे. उपजिल्हा रुग्णालयात सध्या दररोज ४०० ते ५०० रुग्णाची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जात आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, डॉ.आर.के.पाटील, डॉ.वैशाली चांदा, डॉ.जयश्री पाटील, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.हर्षल चांदा उपचार करीत आहे.५० बेड असून रुग्ण संख्या वाढल्यास वाढीव रुग्णांची व्यवस्था करण्यास अडचण येते. परिणामी एका बेडवर दोन रुग्णांना उपचार करावे लागत आहे.जामनेरला डॉक्टर असल्याने उपचारासाठी अडचण येत नाही, मात्र पहूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरचा नसल्याने मोठी अडचण होत आहे. गेल्या काही दिवसापासून पहूरची रुग्णसेवा बंद पडली आहे. स्थानिक नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. जिल्हा शल्यचिकित्सकानी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.जामनेरला सिझेरिनची सुविधादरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांना आवश्यकता भासल्यास सिझेरिन करावे लागल्यास, तशी सुविधा उपलब्ध केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांनी दिली. गेल्या आठ ते नऊ महिन्यात सुमारे शंभरहून जास्त सिझेरीन केल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील महिलांची मोठी सोय झाली.

टॅग्स :Healthआरोग्यJamnerजामनेर