शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

बालकांना कोरोनापासून धोका कमी पण ते ‘सुपर स्प्रेडर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

आयएमए जळगावतर्फे रविवार दि. १९................... रोजी ‘कोविड आणि बालरुग्ण’ या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ...

आयएमए जळगावतर्फे रविवार दि. १९................... रोजी ‘कोविड आणि बालरुग्ण’ या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्रात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदिनी आठवले, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. राजेश पाटील, डॉ. दीपक अटल, डॉ. अविनाश भोसले हे सहभागी झाले आहेत. उपक्रमासाठी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. सी. जी.चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी परिश्रम घेतले.

डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सूत्रसंचालन करताना लहान बालके हे कुटुंबाच्या काळजीच्या केंद्रस्थानी असतात तसेच बऱ्याचदा ते लक्षणे नीटपणे सांगू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये कोविडनिदान उशिरा होते. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या त्रिसूत्रींचा वापर त्यांच्याकडून नीटपणे होत नाही. लहान बालकांमधील कोरोनाचा आजार याबद्दल पालकांमध्ये अनेक प्रश्न असून त्यांचे निरसन करण्यासाठी जळगाव आयएमएतर्फे चर्चासत्र राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

आईच्या दुधातून कोरोनाचा संसर्ग होत नाही

डॉ. नंदिनी आठवले म्हणाल्या की, स्वतः पालकांनी मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर राखण्याचे पालन केले तर मुले नैसर्गिकरीत्या त्याचा अवलंब करतात. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोविडग्रस्त बालकांची संख्या नक्की वाढली आहे. लहान मुलांमध्ये रेमडेसीविर, फॅबिफ्ल्यू, स्टेरॉईड आदी औषधे देत नाहीत. पालकांनी स्वतःच्या मतानुसार औषधी देणे टाळावे. स्तनपान करणाऱ्या कोविडग्रस्त मातांनी मास्क व सॅनिटायझर या प्रतिबंधात्मक गोष्टींचा वापर करणे गरजेचे असते. आईच्या दुधातून कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे त्या म्हणाल्या.

त्रिसूत्रीचा वापर करा व त्यासाठी आग्रह धरा

डॉ. राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये ताप हे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. सर्दी, खोकला, धाप लागणे या बरोबरच हातपाय दुखणे, जेवण व खेळणे बंद होणे आदी लक्षणे प्रामुख्याने जाणवतात. आतापर्यंत कोविडच्या लसींची लहान मुलांमध्ये सुरक्षितता ही सिद्ध व्हायची आहे म्हणून १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांना कोविड लस दिली जात नाही. स्वतः प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचा वापर करा आणि समोरच्यालादेखील त्यासाठी आग्रह धरा, असा सल्ला त्यांनी दिला.

गर्भवती मातेपासून बाळाला रक्ताद्वारे कोविडचे संक्रमण नाही

डॉ. राजेश पाटील म्हणाले की, गर्भवती मातेपासून बाळाला रक्ताद्वारे कोविडचे संक्रमण होत नाही. कोविडग्रस्त मातेच्या बाळाची आरटीपीसीआर चाचणी ४-५ दिवसांनी पुन्हा करावी. अशा बाळाला स्तनपान, मास्क, सॅनिटायझरची खबरदारी घेऊन दिलेच पाहिजे. ५ वर्षापर्यंतची बाळ लक्षणे व तक्रारी नीट सांगू शकत नाही म्हणून त्यांच्यातील कोणताही ताप हा कोरोनासदृश समजून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनपान करणारी आई कोविडची लस घेऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

कोविडग्रस्त मातेच्या नवजात अर्भकाला पोलिओ, बीसीजी देण्यास हरकत नाही

डॉ. दीपक अटल म्हणाले की, कोविडग्रस्त मातेच्या नवजात अर्भकाला पोलिओ आणि बीसीजी या लसी देण्यास हरकत नाही. कोणतेही बाळ कोविडग्रस्त असल्यास लसी ४ ते ६ आठवडे उशिराने द्याव्यात. लहान बाळांमध्ये एचआरसीटी स्कॅनचा आग्रह धरू नये, कारण या एका चाचणीत १०० एक्सरे एवढे रेडिएशन वापरले जाते, त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. पालकांनी स्वतः कोविडग्रस्त असल्यास किंवा बालक कोविडग्रस्त असल्यास सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेऊन डॉक्टरांची फोनवर विशिष्ट वेळ घेऊनच तपासणीला जावे, असा सल्ला त्यांनी दिला.

लहान मुलांना चौकटीत न ठेवता स्वातंत्र्य द्या

डॉ. अविनाश भोसले म्हणाले की, कोरोनामुळे कुटुंबात तणाव व भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीत लहान बालकांचे भावनिक आरोग्य जोपासणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यासोबत खेळताना, हितगूज करताना त्यांच्या स्तरावर जाऊन वागावे. जबरदस्ती किंवा क्षमता तपासण्याचा प्रयत्न करू नका. खेळाच्या किंवा संवादाच्या चौकटी न लादता त्यांना स्वातंत्र्य द्या. नवजात अर्भकाचे उपचार करताना वेगळ्या कक्षात सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेत बाळाचा ताप, श्वास आणि रक्तातील साखर यांना विशेष महत्त्व दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.