शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पित्याने तीन दिवस डांबून ठेवलेल्या बालकाची पोलीसच करताहेत जळगावात देखभाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:00 IST

चिमुकल्याचा लळा : ..अन् ‘खाकी’लाही फुटला मायेचा पाझर

ठळक मुद्देमुलाला उचलून नेण्याचा पित्याचा प्रयत्नभराडीच्या आजीच्या हातून जेवण करीत आहे सोहेल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 25- निलंबित पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पित्याने सलग तीन दिवस घरात डांबून ठेवलेल्या सोहेल रिंकू तडवी (6) या दिव्यांग बालकाची सुटका करुन पोलीस कर्मचारीच त्या बालकाची जिल्हा रुग्णालयात देखभाल करीत आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल रिंकू तडवी हे पत्नी व मुलासह पोलीस लाईन परिसरात राहतात. मुलगा सोहेल हा दिव्यांग व मतीमंद आहे. काही दिवसांपूर्वी तडवी यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची पत्नी माहेरी गेलेली आहे. गेल्या आठवडय़ात रिंकू तडवी हे सोहेलला घरात बंद करून निघून गेले. तीन दिवस झाले तरी मुलगा घरात भुकेला व तहानलेला होता. मुलगा रडत असल्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली व याबाबत जिल्हा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तेथे जाऊन सोहेलला जिल्हा रुग्णालयात हलविले. आठवडाभरापासून दोन पोलीस कर्मचा:यांकडून देखभालगेल्या आठवडय़ात सोहेलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हापासून जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक धनराज निकुंभ व कॉन्स्टेबल प्रदीप पाटील हे येथे थांबून या बालकाची देखभाल करीत आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे स्वत: येथे अधून-मधून येऊन बालकाची विचारणा करीत आहे. या सोबतच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारीही या दिव्यांग मुलाच्या देखभालीसाठी हातभार लावीत आहे. जळगावातील ‘खाकी’ची ही माया पाहून पोलिसांचे  कौतुक करीत आहे. जिल्हा रुग्णालयात जामनेर तालुक्यातील भराडी येथील एक बालक दाखल असून त्याच्या सोबत मनुबाई सीताराम कोळी या बालकाच्या आजी आहे. या ठिकाणी सोहेलला दाखल केल्यानंतर तो कोणाच्या हातून जेवण करीत नसल्याने व काहीही खात पित नसल्याने मनुबाई कोळी यांनीच या बालकाला जवळ घेत त्याला घास भरविण्यास सुरुवात केली. या आजीचा सोहेलला लळा लागला असून अजूनही तो कोणाच्याही हातून न खाता-पिता केवळ याच आजीच्या हातून जेवण करीत आहे. सोहेलला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनीच सोहेलच्या वडिलांचा शोध घेतला. त्यावेळी भजे गल्ली परिसरात आढळून आले. मुलगा जिल्हा रुग्णालयात असल्याने रिंकू तडवी हे त्या ठिकाणी जाऊन मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेथे तैनात पोलीस त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत आहे.