ऑनलाइन लोकमतजि. जळगाव, दि. २६ - बाणगाव धरणात बुडून १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना २६ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली. विशाल गोटू देवरे (वय १०) असे बालकाचे नाव असून तो बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. त्याचेसोबत मित्रही होते. विशाल पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो बुडू लागल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नागरिकांना मदतीसाठी बोलावले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. धरणातील पाण्यात शोध घेतला व बाहेर काढले असता तो मृतावस्थेत होता. रात्री उशीरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
बाणगाव धरणात बालकाचा बुडून मृत्यू
By admin | Updated: June 26, 2017 20:16 IST