शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रिक्षातून उतरताच आईच्या डोळ््यादेखत मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 13:16 IST

स्वखर्चाने शववाहिका आणून मृतदेह केला रवाना

जळगाव : मुंबई येथून उपचार करुन घरी येत असताना नवीन बसस्थानकाजवळ रिक्षातून उतरताच मुलाला भोवळ आली आणि काही क्षणातच त्याने प्राण सोडला. भररस्त्यावर गोंधळात पडलेल्या वृध्द आईची स्थिती पाहता तेथे चहा घेत असलेल्या पोलिसांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी या मुलाला मृत घोषीत केले. युवराज पांडुरंग कुमावत (४९, रा.चुंचाळे, ता.चोपडा) असे या मयताचे नाव आहे.युवराज यांची आई कस्तुराबाई कुमावत यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, युवराज यांची दाढ काढली असता तेथे सेप्टीक झाले. जळगावला उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मुंबईत जाण्याचा सल्ला दिला. ११ महिन्यापासून ते मुंबईत जावून उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वी युवराज व आई कस्तुराबाई मुंबईला गेले. उपचार झाल्यानंतर तेथून बुधवारी सकाळी रेल्वेने जळगावात आले. तेथून चुंचाळे जाण्यासाठी ते रिक्षाने बसस्थानकात आले. बाहेर रिक्षातून उतरत असतानाच युवराज यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. रिक्षा चालक तेथून निघून गेला. अचानक झालेल्या या प्रकाराने वृध्द आई कस्तुराबाई या प्रचंड घाबरल्या. रस्त्यावरच त्यांनी आक्रोश सुरु केला. बाहेर चहा घेत असलेले पोलीस अधीक्षकांचे वाचक तथा सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, त्यांच्या कार्यालयातील प्रवीण पाटील, जमील खान, रवींद्र पाटील, आसिफ पिंजारी व भूषण मांडोळे यांनी वृध्देजवळ धाव घेत तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात हलविले. इतकेच नाही तर ते स्वत: रुग्णालयातही गेले.माणुसकी हीच ओळखकस्तुराबाई यांचा पुणे व व्यारा (गुजरात) येथे असलेल्या दोन्ही मुलांशी पोलिसांनी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे संदीप पाटील यांनी कळवण येथील जावयाशी संपर्क साधून युवराज यांच्या मृत्यूची माहिती दिली. वृध्देसोबत कोणीही नातेवाईक नव्हते. त्याशिवाय शहरातही कोणीच नातेवाईक नसल्याने या पोलिसांनीच स्व:खर्चाने शववाहिका करुन देत मृतदेह चुंचाळे या मुळगावी रवाना केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव