शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

चारठाणा मधपुरी जंगलात जडीबुटी देण्याच्या बहाण्याने लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:28 IST

डायबेटीससाठी जडीबुटी देण्याचा विश्वास दाखवून मुंबई येथून बोलविलेल्या पाच इसमांना चारठाणा मधपुरी भागातील जंगलात नेऊन त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या अंगावरील तब्बल ३२ तोळे सोने व ५२ हजार रोख रक्कम लुटली.

ठळक मुद्देपाचही जणांना बेदम मारहाण३२ तोळे सोने व ५२ हजार रुपये लुटले लुटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : डायबेटीससाठी जडीबुटी देण्याचा विश्वास दाखवून मुंबई येथून बोलविलेल्या पाच इसमांना चारठाणा मधपुरी भागातील जंगलात नेऊन त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या अंगावरील तब्बल ३२ तोळे सोने व ५२ हजार रोख रक्कम लुटली. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वढोदा वनहद्दीत घडली. या भागात बाहेरील लोकांना विविध दुर्मीळ वस्तू देण्याच्या नावाने विश्वास संपादन करून बाहेरील लोकांना बोलवतात आणि त्यांना मारहाण करून लुटमार करणाºया टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.डायबेटीससाठी काळी हळद आणि जडीबुटी देतो, असा विश्वास संपादन करून पवार नामक इसमाने मुंबई येथील जटाशंकर गौड (वय ५३, रा.गोरेगाव मुंबई,) नागेंद्रप्रसाद ठिवर (वय ५२, रा.नालासोपारा, ईस्ट, जि.पालघर), भरत परमार (वय ५०, रा.कांदिवली वेस्ट, मुंबई), दीपक परमार (वय ५०, रा.मालाड ईस्ट, मुंबई) व अतुल मिश्रा (वय ३५, रा.गोरेगाव, मुंबई) यांना मुक्ताईनगर बोलविले. येथील रक्षा पेट्रोल पंपाजवळ हा संशयास्पद इसम त्यांना भेटला. औषध देतो, असे सांगून त्याने या पाचही जणांना चारठाणा मधपुरी परिसरात नेले. तेथे एका झोपडी वजा खोलीत बसविले. थंडपेयदेखील पाजले. औषध दाखवत असताना त्यांच्याच टोळीतील १० ते १५ जण तेथे दाखल झाले. त्यांनी या खोलीचे दार बंद केले आणि मुंबईच्या या पाचही इसमांच्या अंगावर हरणाचे चामडे टाकून तुम्ही हरणाचे चामडे घायला आले, असा बनाव करीत त्यांच्या टोळीतील पवार यास मारण्याचे नाटक केले आणि पाचही मुंबईकराना लाथाबुक्क्यांसह बांबूने बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरील सोने, रोकड आणि मोबाइल हिसकावून पोबारा केला. यात जटाशंकर गौड याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यातील चैन, हातातील अंगठ्या असा तब्बल ३२ तोळे सोने, ५२ हजार रोख आणि मोबाइल या लुटमारीत टोळीने पळवून नेले.लुटमारीनंतर घरी जाण्यास दिले पाच हजारज्या इसमाने त्यांना बोलविले होते त्याने लुटमार करणारे टोळीचे सदस्य असताना अनोळखी असल्याचा बनाव केला आणि लुटमार झालेल्या पीडितांना तुम्ही येथून निघून जा, नाहीतर पोलीस तुम्हालाच पकडतील, असा आव आणला. मदत म्हणून या पीडिताना पाच हजार देऊन या भागातून चालले जा, असे सांगितले व त्याने स्वत: पोबारा केला.आपण गंडविले गेलो, हे लक्षात येताच मुंबईतील हे पाचही जण सायंकाळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आले . वरिष्ठ पातळीवरून त्यांनी संपर्क साधल्याने त्यांची दाद पुकार घेतली गेली. एक पोलीस कॉन्स्टेबल घेऊन त्यांना मधपुरी गावात दुपारी एक वाजता नेण्यात आले. मात्र गावात त्यांना कोणीही मिळून आले नाही. यानंतर त्यांना फिर्याद देण्याकामी कुºहा दूरक्षेत्र पोलीस चौकीत नेण्यात आले आहे.राज्यासह परराज्यातील धनिकांना विश्वास संपादन करून जडीबुटी, नागमणी, दुतोंडी साप, केमिकल राईस, कास्याचे भांडे यासह अन्य दुर्मीळ वस्तू देण्याच्या बहाण्याने या टोळ्या खरेदीदारांना येथे बोलवतात आणि त्यांची लुटमार करतात.हा प्रकार इतका वाढला आहे की, लुटमार होताना सर्वसामान्य नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले तरी कानाडोळा करतात. पार्टी लुटली जात आहे, असे सांगतात. या टोळ्यांना पोलिसांचे अभय असल्याचे ते उघडपणे लुटमार करतात, असा सूर आवळला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMuktainagarमुक्ताईनगर