शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या भूखंड करवसुलीसाठी सर्वेक्षणाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:56 IST

नगररचना व किरकोळ वसुली विभागात समन्वयाचा अभाव

जळगाव : शहरातील खुल्या भूखंडावर अनेकांकडून बांधकाम केले जाते. मात्र, त्यांच्याकडून घराच्या बांधकामाबाबत माहिती दिली जात नसल्याने मालमत्ताकर वसुली ऐवजी खुला भूखंड कर वसुली होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील खुल्या भूखंडाचे सर्वेक्षण करून कर वसुल करण्याचे आदेश उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, कर अधीक्षक वसुली लिपीकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बखळ मिळकतींबाबत  व नवीन झालेल्या मिळकतींबाबत सर्वेक्षण करून बखळ मिळकतींची आकारणी त्वरीत बंद करण्याचे या आदेशात म्हटले आहे. तसेच खुला भुखंड कर विभागाकडील खुला भूखंड कराची आकारणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावी. यासह बखळ जागेवर नविन इमारत उभाणी केली असल्यास जुनी आकारणी डाटा रजिस्टरनुसार तपासणी करुन त्वरित बंद करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश उपायुक्त गुट्टे यांनी दिले           आहेत. कोट्यवधीचा महसूलाकडे होते दुर्लक्ष शहरात हजारो खुले भूखंड आहेत, त्या भूखंड धारकांकडून भूखंडकर वसुली करण्यात येते. मात्र, त्या भूखंडावर घर बांधताना नगररचना विभागाकडून मंजूरी घेतली जाते. मात्र, नगररचना विभागाकडून ही माहिती किरकोळ वसुली विभागाला दिली जात नसल्याने, त्या जागेवर भूखंड करवसुलीच होत असते. नगररचना व किरकोळ वसुली विभागाच्या समन्वयाअभावी मनपाचे कोट्यवधीच्या महसूलावर पाणी फेरले जात आहे. याबाबत मनपा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर आता याबाबत सर्वेक्षण करण्याचे                       आदेश देण्यात आले आहे. याबाबत मनपा कर्मचाºयांकडून दुर्लक्ष केल्यास संबधित कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात            आले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव