शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी येऊ नये : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:01 IST

संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता

ठळक मुद्देकेंद्राने कलम ३६८चा वापर करावाआत्महत्या करू नका

जळगाव : मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असून जळगावात मात्र मराठा समाजाने शांतता राखून संयम बाळगलेला असला तरीही स्फोटक परिस्थिती आहे. आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक असताना मुख्यमंत्री मतांचा जोगवा मागण्यासाठी जळगावात आल्यास मराठा समाजातील युवकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचा इशारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरूवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आला.मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असेही जाहीर करण्यात आले. यावेळी डॉ.राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, अ‍ॅड. सचिन पाटील, ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, राजेश पाटील, नंदू पाटील, गोपाल दर्जी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री २९ रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे ऐकीवात आहे. मराठा समाजाची विनंती आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावरून महाराष्टÑात जाळपोळ व उद्रेकाचे वातावरण झाले आहे. प्रथम तो ज्वलंत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे.केंद्राने कलम ३६८चा वापर करावागोपाल दर्जी म्हणाले की, जिल्ह्यातील मराठा बांधवांनी अजूनही विध्वंसक कार्य केलेले नाही व करणारही नाही. कोणी समाजकंटक समाजाला अशा कृत्यांनी बदनाम करत असेल तर त्याला समाज उत्तर देईल. केंद्र सरकार कलम ३६८ चा वापर करून मराठा समाजाला सहज आरक्षण देऊ शकते. त्याचा विचार करावा, अशी मागणी केली.आत्महत्या करू नकामराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे प्रयत्न होत आहेत. मात्र कोणीही आत्महत्या करू नये. ज्यांनी समाजाला वेठीस धरले आहे, त्यांना पुरून उरा. २०वर्षांपासून हा लढा सुरू असल्याचे भिमराव मराठे यांनी सांगितले. जो संयम ठेवण्याचा सल्ला द्यायला जाईल, त्याच्यावरच समाजबांधवांचा रोष ओढावतो आहे....संतप्त युवकांना समजावणे कठीण जाईलजळगाव शहरात मनपा निवडणूक असल्याने मतदान व आचारसंहितेचा विचार करून मराठा समाजाने शांतता व संयम बाळगला आहे. मात्र युवकांमध्ये प्रचंड संताप आहे. अशा परिस्थितीत जर मुख्यमंत्री समस्या सोडविण्यासाठी येण्याऐवजी मतांचा जोगवा मागण्यासाठी येतील तर या संतप्त युवकांना समजावणे कठीण जाईल. शांतता भंग होईल. अनुचित प्रकार घडू शकतो, अशी शंका डॉ.राजेश पाटील यांनी व्यक्त केली.आमदारांचा राजीनाम्याचा विषय वैयक्तिकमराठा आरक्षणाच्या विषयावर जिल्ह्यातील मराठा आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी करणार का? या प्रश्नावर डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले की, राजीनामा देणे हा आमदारांचा वैयक्तिक व नैतिकतेचा विषय आहे.मुख्यमंत्र्यांनी सांत्वनासाठी जाण्याची गरज...भीमराव मराठे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी येण्याऐवजी मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या काकासाहेब शिंदे या युवकाच्या घरी शिंदे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी जायला हवे होते. या युवकाच्या घरी एकही शासकीय प्रतिनिधी गेलेला नाही.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव