शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

राष्ट्रवादीच्या खासदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

By admin | Updated: November 21, 2014 15:02 IST

बनावट नोंदी व शासकीय कागदपत्रे तयार करणे, काळा पैसा पांढरा करण्यासाठी संगनमताने घोटाळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर, जि.जळगाव : शेतजमिनीवर जादा सागवान लागवड दाखवून बनावट नोंदी व शासकीय कागदपत्रे तयार करणे, काळा पैसा पांढरा करण्यासाठी संगनमताने घोटाळा केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार ईश्‍वरलाल जैन, त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्यासह सहा जणांविरुद्व फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला . 

फिर्यादी रवींद्र लक्ष्मण बर्‍हाटे यांनी हा प्रकार माहिती अधिकारात उजेडात आणला. सीआयडीने चौकशी करून ७ डिसेंबर २0१३ रोजी शासनाला अहवाल सादर करून शासनाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट केले होते.
----------
गुन्हा दाखल करणे, हा प्रत्येकाचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तक्रार फेटाळता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे आता चौकशी करतील. त्यात निष्पन्न होईल, त्यावर केस चालेल. मात्र मी काहीही चुकीचे काम केलेले नाही. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्‍वास आहे. जे आहे ते राजकारण चालले आहे. मनीष व मला अटक करून जेलमध्ये टाकू, असे विधान अनेकदा ऐकायला मिळाले आहे. मात्र न्यायालयावर विश्‍वास आहे. 
-ईश्‍वरलाल जैन, खासदार
(मनीष जैन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही) 
-----------
असे आहेत आरोपी :
ईश्‍वरलाल शंकरलाल जैन, मनीष ईश्‍वरलाल जैन, तत्कालीन वनक्षेत्रपाल एस.एस. पाटील, आगार रक्षक जे.व्ही. सय्यद (जामनेर), तत्कालीन तलाठी युवराज दामू सोनार व भिकाजी गोविंद जोशी अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भादंवि ४२0 (फसवणूक), ४६७ (बनावट कागदपत्रे), ४६८ (फसवणूक ), ४७१ (बनावट दस्ताऐवज खरे म्हणून वापरणे) आणि कलम ३४ (संगनमत) या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.