शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

चातुर्मास आत्मशुध्दीसाठी महत्वाचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 23:15 IST

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती ...

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती देऊन जातो. चातुर्मास हा एक संस्कार आहे. ज्याच्या माध्यमातून आपले शतकानुशतके चालत आलेल्या अनेक चांगल्या गोष्टींचे पुन्हा एकदा अवलोक, पुन्हा एकदा मूल्यमापन आणि पुन्हा आपल्या जीवनात त्या सर्व मूल्यांचे असलेले स्थान हे पाहण्याची संधी या चातुर्मासच्या निमित्ताने मिळत असते. यंदाचा चातुर्मास हा अधिक मास असल्यामुळे पाच महिन्यांचा आहे. या ५ महिन्यांच्या कालावधीत आपण जास्तीत जास्त आपल्या संस्कृती, परंपरा, मूल्यांचे जतन करूया. बऱ्याच ठिकाणी साधू संतांचे आपल्या नियोजित ठिकाणी येणे झाले. बºयाच साधू संतांचे चातुर्मास कोरोनामुळे बदलावे लागले.सर्वच धार्मिक वर्गासाठी हा एक कसोटीचा काळ आहे. मुलांना जेस शाहेतून घरी आल्यानंतर होमवर्क किंवा स्वयंअध्ययन, वाचन करणे हे खूप महत्वाचे असते, त्याचप्रमाणे यावर्षीचा चातुर्मास सर्वांसाठीच होमवर्क व स्वयंअध्ययनाचा आहे. आपण या कालावधीत काय, काय करायला पाहिजे? हे आता स्वत:च ठरवून घ्यायचे आहे. चातुर्मासमधले पहिले कर्तव्य ‘जयणा’ म्हणजे यतना. जीवदया किंवा विवेकपूर्व आचरण असे म्हटले पाहिजे. ‘जयणा धम्मस्स जननी’ धर्माचा उगमच जीवदयेतून आणि विवेकातून होत असतो. चातुर्मासमध्ये जिवोत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते. यासाठी आपल्याला चालताना वा बाकीचे सगळे व्यवहार करताना जितकी जास्तीत जास्त जीवरक्षा घडू शकते, त्यासाठी जागृत राहणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात लहान लहान किड्यांपासून तर अनेक प्रकारचे जीवजंतू जमीन, वातावरणात फिरत असतात. आजच्या कोरोनासारख्या स्थितीत जर हा मुद्दा विवेक विशेष महत्वाचा आहे. आपण स्वत: सुरक्षित राहून बाकीच्या जीवांनासुध्दा आपल्यामुळे त्रास होणार नाही, यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. जसे वर्षाऋतुमध्ये वातावरण आर्द्र असते, आपल्या मनालासुध्दा करूणेनं आर्द्र बनवण्याची प्रेरणा घेऊन हा चातुर्मास काळ आलेला आहे.- श्रमणसंघीय युवाचार्य प्रवर प.पू. महेंद्रऋषीजी महाराज

टॅग्स :Jalgaonजळगाव