शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चोरांच्या १०-१२ खबºयांकडून भर पहाटे जिल्हाधिकाºयांचा पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 19:41 IST

पाठलाग करणाºयास पकडले: मात्र मोटारसायकल सोडून चालक व अन्य फरार

ठळक मुद्देअवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्तरात्रभर गस्ती घालूनही वाळूचोर हाती लागेनानदीपात्रातून मजुरांचा पळ

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.१२- महसूल विभागाच्या अधिकाºयांनी रात्रभर गस्ती घालूनही वाळू चोर हाती लागले नाहीत. पहाटे जिल्हाधिकाºयांनीही स्वत: फिरून पाहणी केली. मात्र रात्रभर गस्त घालणाºया जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या व पहाटे जिल्हाधिकाºयांच्या वाहनाचा मोटारसायकलवर  पाठलाग करणाºया खबºयांकडून आधीच खबर लागल्याने वाळूचोर गायब झाले. पहाटे रथ चौकात केवळ  दोन वाळू ट्रॅक्टर अवैधपणे वाळू वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर पाठलाग करणाºयांपैकी एका मोटारसायकल चालकाला पकडून मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली. तर चालकासह अन्य फरार झाले.खनिकर्म अधिकाºयांचा वाळू चोरांकडून पाठलागजिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण हे शनिवारी रात्री तहसीलदांचे वाहन घेऊन व दोन तलाठ्यांसह रात्रभर शहर व परिसरात गस्त घालत होते. मात्र त्यांच्या पाठीमागे किमान १०-१२ मोटारसायकल चालक पाठलाग करीत होते. त्यामुळे ते ज्या भागात जातील, तेथे आधीच वाळू व्यावसायिक फरार झालेले दिसत होते. अखेर दीपक चव्हाण यांनी याबाबत रात्री जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून माहिती दिली. तसेच दुसºया वाहनातून गस्ती सुरू केली.जिल्हाधिकाºयांचाही पाठलागपहाटे चार वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे देखील चव्हाण यांच्यासोबत गस्तीसाठी निघाले. मात्र जिल्हाधिकाºयांच्या बंगल्याबाहेर दररोजच रात्री उभ्या राहणाºया १०-१२ दुचाकीस्वारांनी जिल्हाधिकाºयांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. अखेर दूध फेडरेशनकडून इंद्रप्रस्थनगरकडे जाताना अखेर या रस्त्यावर एका मोटारसायकलस्वाराला जिल्हाधिकाºयांच्या सुरक्षा रक्षकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटारसायकल सोडून तो पसार झाला. तसेच इतर मोटारसायकल चालकही पसार झाले.पकडलेली मोटारसायकलही गायबमोटारसायकल कुलुप लावून रस्त्याच्या कडेला उभी करून जिल्हाधिकाºयांचे पथक पुढे गेले. मात्र परत येईपर्यंतत कुलुप लावून ठेवलेली मोटारसायकलही गायब  झाल्याचे आढळून आले. या मोटारसायकलचा क्रमांक जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनी टिपला असून आरटीओकडून मालकाची माहिती घेतली जाणार आहे.  पाठलाग करून वाळू ट्रॅक्टर पकडलेभुसावळकडून खेडीकडे जात असताना १ ट्रॅक्टर वाळू नेत असलेले दिसले. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रॅक्टर वेगाने पुढे नेले. त्यामुळे जिल्हाधिकारी व त्यांच्या पथकाने पाठलाग करून रथ चौकाजवळ हे ट्रॅक्टर पकडले. ते ट्रॅक्टर तसेच चालकाला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच कालिंकामाता मंदिराजवळही एक ट्रॅक्टर पकडण्यात आले.नदीपात्रातून मजुरांचा पळजिल्हाधिकाºयांनी निमखेडी, खेडी, नागझिरी, कांताई बंधारामार्गे वैजनाथ, टाकरखेडा, सावखेडा आदी भागात गिरणा नदीपात्रात पाहणी केली. पहाटेच्या अंधारात नदीपात्रात जिल्हाधिकाºयांचे वाहन पोहोचताच नदीपात्रातील मजूर फावडे टोपल्या घेऊन जीवतोडून पळ काढत असल्याचे दिसून आले. यावेळी बँटºयांचा प्रकाश लांबून पाहिल्यावर काजवे चमकल्यासारख दिसून येत होता. एक रिकामे डंपर नदीपात्रातून जात असताना ते अडविण्याचा प्रयत्न करताच ते जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पाठलाग करून वाहन पकडले. चालक मात्र पसार झाला.वाळू टाकून चालक पसार नियमानुसार रिकाम्या वाहनावर कारवाई करता येत नसल्याने वाळू व्यावसायिकांकडून त्याचा गैरवापर होत आहे. पाठलाग सुरू होताच ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावर ओतून देत ट्रॅक्टर आजूबाजूच्या ठिकाणी लावून देत चालक पसार होत असल्याचे दिसून आले.अवैध वाळू वाहतुकीचे मोठे रॅकेटशहर व जिल्'ात वाळू वाहतुकीचे मोठे रॅकेट असून जळगाव परिसरातून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळूची वाहतूक करून ती भुसावळला साठा करून ठेवली जाते. तेथून मोठ्या डंपरद्वारे औरंगाबाद, बुलढाणा येथे चढ्या भावाने विक्री केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शेतीचे ट्रॅक्टर वाळूसाठी: कारवाई करणारजिल्हाधिकाºयांनी सांगितले की, जिल्'ात वाळू गटांचे लिलाव अद्याप झालेले नाहीत. तर आधीच्या वाळू गटांची मुदत संपली आहे. त्यामुळे नागरिकांनी लिलाव होईपर्यंत वाळू खरेदी करू नये. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. तसेच सर्वच ट्रॅक्टर हे शेतीसाठी घेण्यात आले असून त्याचा अवैध वाळू वाहतुकीसाठी अनधिकृतपणे वापर होत आहे. अशा ट्रॅक्टरचे परवाने रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.