लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील चार्टर्ड अकाऊंटट यांना कार्यालये उघडण्यास विशेष परवानगी दिली आहे. त्यानुसार आता सीए सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत कार्यालयात कामकाज करू शकणार आहेत. मात्र कार्यालयात नागरिकांना थेट प्रवेश न देता ई मेल आणि दूरध्वनीवरच आवश्यक कागदपत्रांची मागणी करा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा दिले आहेत.
त्यासोबतच अभ्यासिका या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. त्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेची मुभा देण्यात आली आहे. तसेच काम करणारे कर्मचारी तसेच अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, किंवा कोविड १९ आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत बाळगावा, तसेच खासगी प्रवासी वाहतूक कार्यालयांनादेखील कडक निर्बंधातून सुट देण्यात आली आहे. त्यात सरकारच्या निर्देशानुसार कार्यालये सुरू ठेवली जावीत तसेच त्यातील कर्मचाऱ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, किंवा १० एप्रिलपासून आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवालसोबत बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.