शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

औपचारिकतेनंतर चंदू चव्हाण घरी परतणार

By admin | Updated: January 24, 2017 01:34 IST

संरक्षण राज्यमंत्री : दबाव निर्माण केल्याने पाकिस्तानने केली चंदूची मुक्तता

जळगाव : खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण यांच्या लष्कराकडून  वैद्यकीय चाचणीसह काही औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर चंदू कुटुंबीयांना भेटू शकेल अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सोमवारी सकाळी 10.30 वाजता जळगाव जिल्हा भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. 29 सप्टेंबर 2016 रोजी चंदू चव्हाण हा चुकून पाकिस्तानात गेला होता. चंदू परत यावा यासाठी खान्देशच नव्हे तर देशभरातील नागरिकांची अपेक्षा होती. आतार्पयतचा इतिहास असा आहे की पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान हा कधीही परत आलेला नाही. यामुळे सर्वच जण चिंतीत होते. आपण ज्या वेळी खान्देशात येत होतो त्यावेळी लहानांपासून मोठय़ांर्पयत सर्वजण चंदू केव्हा भारतात येईल, अशी विचारणा करीत होते. चंदूच्या सुटकेसाठी आम्ही संरक्षण मंत्रालयामार्फत प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला पाकिस्तानने चंदू आमच्याकडे नाही, चौकशी सुरु आहे असे सांगत झुलवित ठेवले. मात्र विदेश मंत्रालय, संरक्षण मंत्रालयामार्फत आम्ही आंतरराष्ट्रीयस्तरावर दबाव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकरणी संवेदनशील होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पाकिस्तान डीजीएमओ कडून सकारात्मक प्रतिसाद            मिळाला. शनिवारी दुपारी 3 वाजता पाकिस्तानने चंदू चव्हाण याला वाघा बॉर्डरवर भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले.पाकिस्तान मधून परत आल्यानंतर चंदू याच्या लष्कराच्या नियमानुसार वैद्यकीय तपासणीसह काही औपचारिक चौकशी पूर्ण होईल. त्यानंतर काही दिवसात तो कुटुंबियांना भेटू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जवान व खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण याला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविण्यासाठी मोठे योगदान दिल्याबद्दल सोमवारी सकाळी 10.30 वाजता जळगाव महानगर भाजपातर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर जिल्हा भाजपा कार्यालयात पदवीधर मतदार संघासाठी भाजपाचे उमेदवार डॉ.प्रशांत पाटील यांची प्रचार सभा व जिल्हा पदाधिका:यांच्या भेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, सुभाष शौचे, महेश जोशी, दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.  चंदू चव्हाण याला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविल्याबद्दल जळगाव महानगर भाजपातर्फे अभिनंदनाचा ठराव माजी             नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी मांडला. हा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.  भाजपाने केंद्रात व राज्यात बहुमत मिळवित सत्ता मिळविली आहे. मात्र गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्या ठिकाणी कायदे            होतात त्या विधान परिषदेत अजूनही आपण अल्पमतात आहोत. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघामधील भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी          ही प्रत्येक कार्यकत्र्यावर असल्याचे भामरे यांनी           सांगितले.